'हिंदू असो वा मुस्लिम सर्वांवर दाह संस्कार हवे'

वृत्तसंस्था
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

साक्षी महाराज यांचे वाद्‌ग्रस्त वक्तव्य

नवी दिल्ली: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे आणखी दोन टप्पे कायम असताना भाजपमधीलच काही नेते मंडळी बेताल वक्तव्ये करत आपल्याच पक्षाची अडचण वाढविताना दिसतात. आता भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी हिंदू असो अथवा मुस्लिम सर्वांवर मृत्यूनंतर अग्निसंस्कार केले जावेत, असे वाद्‌ग्रस्त वक्तव्य केले आहे, त्यांच्या या वक्तव्यास राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव आणि मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते डी. राजा यांनी आक्षेप घेतला आहे.

साक्षी महाराजांनी यापूर्वीही अशी बेताल वक्तव्ये केली असून त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी, निवडणूक आयोगाने त्याची गंभीर दखल घ्यायला हवी. पंतप्रधान मोदी हे देशातील घटनात्मक चौकट कायम ठेवण्यात अपयशी ठरले असून ते भाजप नेत्यांवरदेखील नियंत्रण ठेवण्यास असमर्थ ठरले आहेत, असे लालूप्रसाद यांनी म्हटले आहे. भारतामध्ये दीड कोटीपेक्षाही अधिक साधू आहेत, सगळ्यांची समाधी बांधायची झाल्यास किती जमीन लागेल? तसेच देशात 20 कोटी मुस्लिम असून सर्वांचीच कबर बांधायची झाली तर आपल्या देशात जमीन तरी शिल्लक राहील काय? तुम्ही त्याला कब्रस्तान म्हणा अथवा स्मशानभूमी प्रत्येक मृतदेहावर अग्निसंस्कारच व्हायला हवेत, असे साक्षी महाराज यांनी नमूद केले.

Web Title: sakshi maharaj statement on hindu-muslim Cremation