अखेर सलमान लटकला; काळवीट शिकार भोवली

वृत्तसंस्था
गुरुवार, 5 एप्रिल 2018

अभिनेता सलमान खानला जोधपूरच्या न्यायालयाने काळविट शिकार केल्याप्रकरणी दोषी ठरवले असून, यातील अन्य काही कलाकारांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

मुंबई : अभिनेता सलमान खानला जोधपूरच्या न्यायालयाने काळविट शिकार केल्याप्रकरणी दोषी ठरवले असून, यातील अन्य काही कलाकारांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. मात्र, सलमान खान दोषी आढळल्यामुळे न्यायालयाकडून त्याला आज शिक्षा सुनावली जाणार आहे.

सलमान खानवर दाखल झालेले खटले...

काळवीट शिकारप्रकरण : सलमान खान 1, 2 ऑक्टोबर, 1998 रोजी 'हम साथ साथ हैं' या चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी राजस्थानच्या कांकनी येथे आला होता. त्याच्यासोबत त्याचे सहकलाकार अभिनेता सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि निलम यांच्यावर वन्यजीवी संरक्षण कायद्यांतर्गत खटला दाखल करण्यात आला होता. मात्र, याप्रकरणी सलमान खानला दोषी ठरविण्यात आले असून, याप्रकरणातील सैफ अली, सोनाली, तब्बू आणि निलम यांना न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

शस्त्रास्त्र कायदा : सलमान खानविरोधात शस्त्रास्त्र कायदा, 1959 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सलमान खानचा शस्त्रास्त्र परवाना संपला तेव्हा त्याने अग्निशस्त्राचा वापर केला असल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता. 

चिंकारा शिकारप्रकरण : सलमान खानने चिंकाऱ्याची शिकार केली होती. त्याच्यावर वन्यजीवी संरक्षण कायदा, 1998 अंतर्गत खटला दाखल करण्यात आला. हे प्रकरण 26 सप्टेंबर, 1998 रोजी झाले. याप्रकरणी न्यायालयाने त्याला दोषी ठरवले होते. मात्र, उच्च न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली.

'हिट अँड रन' प्रकरण : 28 सप्टेंबर, 2002 रोजी ही घटना घडली. याप्रकरणात न्यायालयाने सलमान खानला दोषी ठरवले होते. मात्र, उच्च न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली. तरी सध्या याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

Web Title: Salman Khan convicted in blackbuck poaching case cases registered