शिक्षा ऐकून सलमानच्या डोळ्यात पाणी

वृत्तसंस्था
गुरुवार, 5 एप्रिल 2018

अखेर आज दुपारी त्याला पाच वर्षांची शिक्षा सुनाविण्यात आली आहे. त्यामुळे त्याला आजच कारागृहात जावे लागणार आहे. सलमान या प्रकरणी सत्र न्यायालयात अपील करण्याची शक्यता आहे. या खटल्याच्या सुनावणीवेली सलमानचे कुटुंबीयही उपस्थित होते.

जोधपूर : काळविटाची शिकार केल्याप्रकरणाच्या खटल्यातील मुख्य आरोपी असलेला अभिनेता सलमान खान याला जोधपूर न्यायालयाने आज (गुरुवार) दोषी ठरवत पाच वर्षांची शिक्षा सुनावली. न्यायालयाकडून सलमानला शिक्षा सुनावल्यानंतर सलमान खानच्या डोळ्यात पाणी आले. तसेच त्याचा बहिणी अर्पिता, अल्विरा यांना न्यायालयातच रडू कोसळले.
 
काळविट शिकारप्रकरणी न्यायालयाने सहआरोपी सैफअली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि नीलम यांची निर्दोष मुक्तता केली. मात्र, सलमान खानला न्यायालयाने दोषी ठरवले. या प्रकरणाचा निकाल ऐकण्यासाठी सलमान खान तसेच या प्रकरणातील कलाकारही न्यायालयात उपस्थित होते. सलमान वगळता या पाच जणांना निर्दोष मुक्त करण्यात आले. या प्रकरणाची अंतिम सुनावणी 28 मार्चला संपली होती. त्या वेळी मुख्य न्यायदंडाधिकारी देवकुमार खत्री यांनी निकाल राखून ठेवला होता. 

अखेर आज दुपारी त्याला पाच वर्षांची शिक्षा सुनाविण्यात आली आहे. त्यामुळे त्याला आजच कारागृहात जावे लागणार आहे. सलमान या प्रकरणी सत्र न्यायालयात अपील करण्याची शक्यता आहे. या खटल्याच्या सुनावणीवेली सलमानचे कुटुंबीयही उपस्थित होते.

Web Title: Salman Khan Cries after Hearing Punishment in Blackbuck Poaching Case