सलमान खानचे "तुफान' शमणार

पीटीआय
बुधवार, 19 ऑक्टोबर 2016

'थम्स अप'च्या ब्रॅंड अँबॅसिडरपदावरून गच्छंती, तर रणवीर सिंगची लागणार वर्णी
नवी दिल्ली - भारतातील शीतपेय व्यवसायातील प्रमुख कंपनी कोका कोलाने "थम्स अप'च्या उत्पादनाच्या ब्रॅंड ऍबॅसिडर पदावरून सिने अभिनेता सलमान खानची काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या चार वर्षांपासून जाहिरात विश्‍वात सलमानचा "थम्स अप'सोबत करार होता. सलमानच्या जागी आता रणवीर सिंगची वर्णी लागली आहे.

गेल्या महिन्यात कंपनीसोबत सलमानचा करार संपुष्टात आला. यानंतर करार नूतनीकरणाबाबत कंपनीकडून सलमानशी कोणताही संपर्क करण्यात आला नाही. याबाबत कोका कोला इंडियाकडून प्रतिक्रिया देण्यास नकार देण्यात आला. कोका कोला कंपनी गेल्या काही दिवसांपासून अधिक तरुण स्टारच्या शोधात होती, म्हणूनच सलमानसोबत कराराचे नूतनीकरण करण्यात आले नाही, असे सांगण्यात आले.

सलमान हा भारतातील प्रमुख सेलिब्रिटी असून बड्या ब्रॅंडच्या जाहिरातीसाठी तो वर्षाकाठी 5 कोटी रुपयांचा करार करत असतो. सध्या विविध कारणांनी सलमानची ब्रॅंड व्हॅल्यू घटत चालली आहे. पाकिस्तानी कलाकारांना पाठिंबा देण्यावरून सलमानवर टीका करण्यात आली होती.

कोका कोलाचे स्टारडम
2012 मध्ये कोका कोलाने अक्षय कुमारच्या जागी ब्रॅंड अँबॅसिडर म्हणून सलमान खानची नियुक्ती केली होती. त्याचवेळी कोका कोलाने सलमानच्या "बिइंग ह्युमन' या चॅरिटेबल ट्रस्टशी करार केले होते. तर 2000 पासून अक्षय कुमार कोका कोलाच्या "थम्स अप'च्या उत्पादनांसाठी काम करत होता. बड्या स्टार्सना आपल्या ब्रॅंडच्या प्रमोशनसाठी करारबद्ध करणे ही कोका कोलाची खासियत मानली जाते. आता रणवीर सिंग हा बॉलिवूडचा सर्वांत तरुण उमदा कलाकार असल्याने त्याची सलमानच्या जागी वर्णी लागणार आहे.

Web Title: salman khan suspend on thums up brand ambassador post