पिझ्झा, मॅगी आणि चिप्स खात असाल तर थांबा...

वृत्तसंस्था
बुधवार, 18 डिसेंबर 2019

दिवसेंदिवस जंक फूड खाण्याचे प्रमाण वाढत आहे. पण, या जंक फूडमुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. जंक फूड खाण्यापूर्वी नक्कीच विचार करा, असा इशारा देण्यात आला आहे.

नवी दिल्ली : दिवसेंदिवस जंक फूड खाण्याचे प्रमाण वाढत आहे. पण, या जंक फूडमुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. जंक फूड खाण्यापूर्वी नक्कीच विचार करा, असा इशारा देण्यात आला आहे.

विरोधी अन्न सेवन करणे शरीरस्वास्थ्याच्या दृष्टीने योग्य नसते...

पिझ्झा, चिप्स, खारे पदार्थ, मॅगी नूडल्स यामध्ये मीठ आणि फॅटचे प्रमाण तुलनेने खूपच जास्त असते. जंक फूडमध्ये हे सगळे घटक सरकारने घालून दिलेल्या नियमांपेक्षाही अति प्रमाणात असतात, असे सेंटर फॉर सायन्स अँड एनव्हायर्नमेंटने केलेल्या चाचण्यांमध्ये आढळून आले आहे. या संस्थेच्या प्रमुख सुनीता नारायण यांच्या मते, अशा प्रकारच्या जंक फूडवर एक वैधानिक इशारा असायला हवा. या पदार्थात मीठ आणि फॅट्सचं प्रमाण जास्त आहे, हे त्यांनी नमूद करायला हवे. शिवाय, ट्रान्सफॅटमुळे हृदयविकार होण्याचा संभव जास्त असतो. त्यामुळेच अशा ट्रान्सफॅटपासून लांब राहिले पाहिजे, असा इशाराही सुनीता नारायण यांनी दिला आहे.

वृत्तपत्रांमध्ये बांधलेले खाद्यपदार्थ विषारी

जंक फूडमध्ये ट्रान्सफॅटचे प्रमाण जास्त असते. अनसॅच्युरेटेड फॅटससाठी ट्रान्सफॅट हा शब्द वापरला जातो. ट्रान्सफॅट म्हणजे दुहेरी कार्बन-कार्बन बाँड असतो. ट्रान्सफॅट हे काही वेळा मोनो सॅच्युरेटेड किंवा पॉलिसॅच्युरेटेड असू शकतात; पण ते कधीही सॅच्युरेटेड असत नाहीत. ट्रान्सफॅटचा अर्थ मेद. ज्या पदार्थांत नैसर्गिकरीत्या मेद असतो, त्याचे शरीरावर फारसे घातक परिणाम होत नाहीत.

आयुर्वेदातील अन्य संस्कार

जंक फूड सारखे खाद्यपदार्थ तुम्हाला खायचे असतील तरी हरकत नाही. पण, यामध्ये कोणकोणते घटक आहेत याची जाणीव होण्यासाठी संशोधन करण्यात आले आहे.

शेवग्याच्या शेंगा भाजीत किंवा आमटीत टाकण्याची पद्धत आहे...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: salt transfat high in many popular junk foods says cse report