'सम' रुग्णालयाचा प्रमुख अखेर शरण

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 20 ऑक्टोबर 2016

भुवनेश्‍वर आग प्रकरण; पोलिसांकडून चौकशी
भुवनेश्‍वर - सम रुग्णालय आगप्रकरणी फरार असलेले मालक मनोज नायक यांनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली. सोमवारी सायंकाळी झालेल्या दुर्घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला आहे. नायक यांच्या अटकेने या प्रकरणात अटक होणाऱ्या आरोपींची संख्या पाच झाली आहे.

भुवनेश्‍वर आग प्रकरण; पोलिसांकडून चौकशी
भुवनेश्‍वर - सम रुग्णालय आगप्रकरणी फरार असलेले मालक मनोज नायक यांनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली. सोमवारी सायंकाळी झालेल्या दुर्घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला आहे. नायक यांच्या अटकेने या प्रकरणात अटक होणाऱ्या आरोपींची संख्या पाच झाली आहे.

नायक यांनी खांडगिरी पोलिस ठाण्यात शरणागती पत्करली आणि त्यांची चौकशी सुरू आहे. नायक याने काल तीनच्या सुमारास शरणागती पत्करली. त्यांना अज्ञात स्थळी नेण्यात आले असून, त्यांची चौकशी करण्यात येत आहे. नायक आणि त्यांची पत्नी शाश्‍वती दास यांच्या नावाने लुकआउट नोटीस बजावली होती. दोन्ही आरोपी शिक्षा अनुसंधान विश्‍वस्त संस्थेचे विश्‍वस्त आहेत. शाश्‍वती दास यांचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाही. काल रात्री नायक यांच्या घराची झडती घेण्यात आली आणि त्यात महत्त्वाची कागदपत्रे हाती लागल्याचे पोलिसांनी सांगितले. चौकशीदरम्यान आणखी काही लोकांना अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. काल आरोग्य मंत्र्यांनी कारवाईबाबत स्पष्ट निर्देश दिल्यानंतर लुकआउट नोटीस बजावण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी सम रुग्णालयाचे वरिष्ठ आरोग्य अधिकारी पुष्पराज सामंतसिंघारसह चौघांना अटक केली होती. त्यात रुग्णालयातील सुरक्षा अधिकारी आणि इलेक्‍ट्रिकल इंजिनिअरचा समावेश आहे. या चार अधिकाऱ्यांना राज्य सरकारच्या अग्निशामक दलाकडून दाखल करण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारावर अटक करण्यात आली. राज्य सरकारने रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणा सुधारावी असे निर्देश तीन वर्षांपूर्वी दिले होते. मात्र, या निर्देशाकडे दुर्लक्ष केल्याने रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. रुग्णालयाकडे अग्निशामक दलाचे सुरक्षा प्रमाणपत्र नसल्याचे आढळून आले आहे.

Web Title: sam hospital chief surrender

टॅग्स