Loksabha 2019 : पित्रोदांकडून पाकला क्लीन चिट, मोदींचा काँग्रेसवर निशाणा

narendra-modi
narendra-modi

नवी दिल्ली - पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यावर सॅम पित्रोदा यांनी प्रश्न उपस्थित केले. सॅम पित्रोदा हे गांधी घराण्याचे निकटवर्तीय असून इंडिअन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख आहेत. भारताच्या हवाई हल्ल्यात खरंच 300 दहशतवाद्यांचा मृत्यू झाला का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. यावर बोलताना पंतप्रधान नरेंदी मोदींना त्यांच्यावर निशाणा साधला. तसेच विरोधी पक्षाकडून सुरक्षायंत्रणांचा अपमान झाल्याचेही मोदी म्हणाले आहेत 

पित्रोदा यांच्या या विधानांमुळे काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. काही लोकांमुळे संपूर्ण पाकिस्तानला दोषी ठरवता येणार नाही, पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकवर केलेल्या कारवाईची पद्धतही चुकीची होती, असे मतही पित्रोदा यांनी व्यक्त केले. त्यानंतर पाकिस्तान दहशतवादाचे नंदनवन असल्याचे आपल्याला माहित असताना काँग्रेस पाकिस्तान आणि दहशतवाद या दोघांना वेगळे करु पाहत असल्याचेही मोदी म्हणाले आहेत. 

याबाबत मोदींनी ट्विट देखील केले आहे. यामध्ये सॅम पित्रोदा यांच्या विधानाला टॅग करताना त्यांनी जनतेला अशा प्रकारे सुरक्षायंत्रणाचा अपमान करणाऱ्या विरोधी पक्षाला जाब विचारण्याचे आवाहन केले आहे. तसेच 130 कोटी भारतीयांचा आपल्या सुरक्षायंत्रणावर विश्वास असून, सर्व भारतीय त्यांच्या पाठिशी असल्याचेही मोदी म्हणाले आहेत.

यावेळी #JantaMaafNahiKaregi असा हॅशटॅगही मोदींनी वापरला आहे. तसेच एका ट्विटमध्ये जगभरातून पाकिस्तानकडे दहशतवादी देश म्हणून पाहिले जात असताना पित्रोदा पाकला क्लीन चिट देत असल्याचे मोदींना म्हटले आहे.  

मुंबई हल्ल्यावेळी आठ लोक इथे आले आणि त्यांनी हल्ला केला. मात्र, यामुळे तुम्ही पाकिस्तानातील सर्व नागरिकांना दोषी ठरवू शकत नाही, पण हीच गोष्ट आपण स्वीकारत नाही, असेही सॅम पित्रोदा यांनी म्हटले होते. त्यानंतर मोदींनी त्यांच्यावर टीका केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com