'सप'ला 298, तर कॉंग्रेसच्या वाट्याला 105 जागा

वृत्तसंस्था
रविवार, 22 जानेवारी 2017

नवी दिल्ली  : समाजवादी पक्ष आणि कॉंग्रेसमधील जागावाटपाचा तिढा आज सुटल्यानंतर दोन्ही पक्षांनी एकत्रितपणे विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्धार केला आहे. समाजवादी पक्ष 403 पैकी 298 जागांवर आपले उमेदवार उभे करणार असून, कॉंग्रेसच्या वाट्याला 105 जागा आल्या आहेत.

तत्पूर्वी अखिलेश यांनी कॉंग्रेसशी चर्चा न करता परस्पर समाजवादी पक्षाची पहिली उमेदवार यादी जाहीर केल्यानंतर संभाव्य आघाडीवर अनिश्‍चिततेचे धुके दाटले होते. अखेरीस कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी यात लक्ष घातल्यानंतर आघाडीचा मुद्दा मार्गी लागला. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राज बब्बर आणि समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नरेश उत्तम यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत आघाडीची घोषणा केली.

शनिवारी रात्री उशिरापर्यंत जागावाटपावरून कॉंग्रेस आणि समाजवादी पक्षामध्ये चर्चा सुरू होती, कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी या अनुषंगाने मुख्यमंत्री अखिलेश यांच्याशी चर्चा केल्यानंतर अखेर आघाडीचा निर्णय घेण्यात आला. पक्षाचा किमान समान कार्यक्रम पुढील आठवड्यात आखण्यात येईल, असे राज बब्बर यांनी सांगितले. अखेरच्या टप्प्यामध्ये कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी हस्तक्षेप केल्याने समाजवादी पक्षाने माघार घेतल्याचे बोलले जाते.

Web Title: samajwadi gets 298, congress gets 105 seats