Loksabha 2019 : अखिलेश लोकसभेच्या मैदानात; येथून लढणार

Loksabha 2019 : अखिलेश लोकसभेच्या मैदानात; येथून लढणार

लखनौ : समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेश माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. ते वडील मुलायमसिंह यादव यांची पारंपारिक मतदारसंघ असेल्लाय आझमगड या मतदारसंघातून निवडणुक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरवात झाली असून, 11 एप्रिल ते 19 मे पर्यंत सात टप्प्यात निवडणुका होणार आहेत. यामध्ये समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आझमगड या लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढणार असून, पक्षाचे नेते आझम खान हेही उत्तरप्रदेशातील रामपूर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढणार आहेत. समाजवादी पक्षाने आज आपल्या उमेदवारांची घोषणा केली.

उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि मायवतींच्या बहुजन समाज पक्षाची (बसप) आघाडी झालेली आहे. भाजपला लढत देण्यासाठी या दोन्ही पक्षांनी आघाडी केली आहे. काँग्रेसनेही स्वतंत्रपणे आपले उमेदवार घोषित करत  यांना टक्कर देण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसने नुकतेच सप आणि बसपच्या मुख्य जागांवर आपले उमेदवार घोषित केलेले नव्हते.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com