मुस्लिमांना सपाचे गुलाम बनविण्याचे प्रयत्न फसले- मायावती

वृत्तसंस्था
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

मुस्लिम समाज आता स्वत:चे चांगले- वाईट कशात आहे, हे समजून स्वत: निर्णय घेत आहे.

लखनौ  : मुस्लिमांना समाजवादी पक्षाचे गुलाम बनविण्याचा प्रयत्न फसल्याचे स्पष्ट करीत बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी आज समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्यावर टीका केली. आझम खान यांनी स्वत:च्या प्रामाणिकपणाला बाजूला करून मुलायमसिंह आणि अखिलेश यादव यांच्यापुढे लोटांगण घातल्याचे त्या म्हणाल्या. मुसलमानांना समाजवादी पक्षाचे गुलाम बनविण्याचा त्यांचा प्रयत्न पूर्णपणे फसल्याचे त्या म्हणाल्या.

मुस्लिम समाज आता स्वत:चे चांगले- वाईट कशात आहे, हे समजून स्वत: निर्णय घेत आहे. त्यांना आता हे माहिती आहे की, उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि त्याचे नेतृत्वच भाजप आणि कंपनी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जातीयवादाला रोखू शकेल. त्यामुळेच त्यांनी मोठ्या संख्येने विधानसभा निवडणुकीत सहभागी होत आहेत, असे मायावती म्हणाल्या.

त्या म्हणाल्या की, आझम खान यांच्या नाराजीचे हेच कारण आहे. बहुजन समाज पक्षाने कधीच कोणत्याही समाजाला मान खाली घालायला लावली नाही. हा पक्ष सर्व समाजाच्या सर्व स्तरांसाठी निष्ठा आणि ईमानदारीने काम करीत आहे. त्यामुळे मुस्लिम समाजाला बहुजन समाज पक्षावर विश्‍वास आहे.

Web Title: samajwadi party unsuccessful in enslaving muslims, says mayawati