esakal | मराठा आरक्षणाच्या मुद्द्याकडे मोदींचे दुर्लक्ष? संभाजीराजेंच्या ३ पत्रांना प्रतिसाद नाही
sakal

बोलून बातमी शोधा

sambhaji raje and narendra modi.jpg

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी खासदार संभाजीराजे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तीन पत्रे लिहिली होती.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्याकडे मोदींचे दुर्लक्ष? संभाजीराजेंच्या ३ पत्रांना प्रतिसाद नाही

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटताना दिसत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी खासदार संभाजीराजे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तीन पत्रे लिहिली होती. मात्र, एकाही पत्राला उत्तर मिळालेले नसल्याचे कळत आहे. एका मराठी माध्यमाने हे वृत्त दिले आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. तसेच मराठा आरक्षणाचा मुद्दा मोठ्या खंडपीठाकडे सोपवण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मराठा समाज आक्रमक झाला असून पुन्हा एकदा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करता यावी यासाठी संभाजी राजे यांनी पंतप्रधान मोदी यांना आतापर्यंत तीन पत्रे पाठवली आहेत. यावर महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांच्या सह्या आहेत. मात्र, पंतप्रधान कार्यालयाकडून यातील एकाही पत्राला उत्तर देण्यात आले नाही. 

दीपिका पदूकोण आज चार्टर विमानाने गोव्याहून मुंबईला होणार रवाना, एनसीबीच्या...

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षण संघर्ष समितीची बुधवारी कोल्हापुरात राज्यस्तरीय गोलमेज परिषद भरली होती. सुरेश पाटील यावेळी अध्यक्षस्थानी होते. यापुढेही मराठा आरक्षणाची लढाई 'एक मराठा लाख मराठा' या बॅनरखालीच लढवण्याचे ठरवण्यात आले. तसेच जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्यात येईल असा निर्धार यावेळी करण्यात आला. 

राज्य शासनाने कॅबिनेटमध्ये ९ मुद्दे जाहीर केले होते. या नऊ गोष्टींची पुर्तता कधी व कशी करणार हे मराठा समाजाला पटवून द्यावे लागणार आहे. अन्यथा, १० ऑक्टोंबरला महाराष्ट्र बंद करणार असल्याचा निर्णय राज्यस्तरीय गोलमेज परिषदेत झाला आहे. 

'जॉन्सन अँड जॉन्सन'ची लस शेवटच्या टप्प्यात; एकाच डोसमध्ये प्रभावी...

महाराष्ट्र शासनाकडून केल्या जाणाऱ्या मेगा भरतीला स्थगिती मिळावी, शिवस्मारकाचे काम तातडीने व्हावे, राज्यातील शेतकऱ्यांचे सरसकट वीजबिल माफ करावे, कोपर्डी प्रकरणातील दोषींना त्वरित शिक्षा मिळावी, राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये वसतिगृहे व्हावीत, आदी ठराव परिषदेने मंजूर केले आहेत. विजयसिंह महाडिक यांनी ठरावांचे वाचन केले तर भरत पाटील यांनी अनुमोदन दिले. सर्वानुमते हे ठराव शासनाला पाठवले जाणार आहेत. मराठा आरक्षण संघर्ष समितीचे सुरेश पाटील यांच्यासह राज्यातील पन्नासहून अधिक संघटनांचे पदाधिकारी परिषदेत सहभागी झाले आहेत.