भावांनी दिले अल्पवयीन मुलाला पेटवून

वृत्तसंस्था
शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2017

राम प्रसाद यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आपला नातू योगेंद्र हा मंदिरात गेला असताना त्याचे तीन भाऊ छोटू, सुगरपाल आणि धर्मपाल यांनी त्याच्यावर केरोसिन टाकून त्याला पेटवून दिले

संभल - येथे एका अल्पवयीन मुलावर तीन भावांनी केरोसिन टाकून त्याला पेटवून दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी आज सांगितले. या मुलाच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.

दबत्रा गावात काल रात्री ही घटना घडल्याची माहिती मंडल अधिकारी सुरेशकुमार यांनी सांगितले. राम प्रसाद यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आपला नातू योगेंद्र हा मंदिरात गेला असताना त्याचे तीन भाऊ छोटू, सुगरपाल आणि धर्मपाल यांनी त्याच्यावर केरोसिन टाकून त्याला पेटवून दिले.

योगेंद्र याला अलिगढला उपचारासाठी नेण्यात आले मात्र तेथे तो मरण पावला, असे कुमार यांनी सांगितले.

Web Title: sambhal uttar pradesh

टॅग्स