भारताकडून समझौता रद्द

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

पाकिस्तानने समझौता एक्‍स्प्रेसला लाल झेंडा दाखविल्यानंतर आता भारतानेदेखील आपल्या बाजूने ही रेल्वे सेवा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, भारताकडून ही रेल्वे सेवा दिल्ली ते अटारीपर्यंत होती, तर पाकिस्तानमध्ये ही गाडी लाहोर ते अटारीदरम्यान धावत असे.

नवी दिल्ली - पाकिस्तानने समझौता एक्‍स्प्रेसला लाल झेंडा दाखविल्यानंतर आता भारतानेदेखील आपल्या बाजूने ही रेल्वे सेवा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, भारताकडून ही रेल्वे सेवा दिल्ली ते अटारीपर्यंत होती, तर पाकिस्तानमध्ये ही गाडी लाहोर ते अटारीदरम्यान धावत असे.

भारतीय प्रवासी हे अटारी स्थानकावर पोचल्यानंतर गाडी बदलत असत. उभय देशांतील द्विपक्षीय संबंधांमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर पाकने समझौता आणि थार एक्‍स्प्रेस अशा दोन्ही गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: samjhauta express cancel by india