Video: हॅलो, संजना बोलतेय; अन् तिथचं फसला...

वृत्तसंस्था
Wednesday, 18 December 2019

व्हॉट्सऍपवर मेसेज आला, हाय. त्या मॅसेजला रिप्लाय दिला आणि प्रेमाचा सिलसिला सुरू झाला. हॅलो, संजना बोलतेय... या आवाजाने भुरळ पाडली अन् तिथेच एक व्यापारी फसला गेला तब्बल 50 लाख रुपयांना.

जोधपूर (राजस्थान): व्हॉट्सऍपवर मेसेज आला, हाय. त्या मॅसेजला रिप्लाय दिला आणि प्रेमाचा सिलसिला सुरू झाला. हॅलो, संजना बोलतेय... या आवाजाने भुरळ पाडली अन् तिथेच एक व्यापारी फसला गेला तब्बल 50 लाख रुपयांना.

 ऐसे लूटा प्यार में पागल रवि को
दोन मित्र अऩ् एक मैत्रिण; तर मैत्रिण कोणाची?

एक युवक मुलीचा आवाज काढायचा. आवाज एवढा हुबेहुब होती की कोणाला संशयही येत नव्हता. हॅलो, संजना बोलतेय... या आवाजावरच समोरील व्यक्ती प्रेमात पडायची. पुढील व्यक्ती प्रेमात पडली की वेगवेगळे कारणे काढून पैसे लुटायचा. मध्य प्रदेशातील सिद्धार्थ पटेल असे त्याचे नाव आहे. चौपसनी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. जोधपूर येथील व्यापारी रवी इनानिया याला 50 लाख रुपयांना फसवल्याचा आरोप आहे. जोधपूर पोलिस संजना ऊर्फ सिद्धार्थची पुढील चौकशी करत आहेत.

(छायाचित्रे: hindi.oneindia.com)

पती अन् चार मुलांपेक्षा तूच आवडतो...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ पटेल याची उच्च जीवनशैली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून संजना नावाच्या मुलीचा आवाज काढून व्यापारी व युवकांना फसवण्याचे काम करत होता. फोनवरून तो हुबेहुब मुलीचा आवाज काढत असे. जोधपूर येथील व्यापारी रवीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून 50 लाख रुपायांना फसवले आहे. चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने नऊ जणांना फसल्याची माहिती समोर आली. सिद्धार्थ हा संजना बरोबरच आई, वडील, आजी, आजोबा, भाऊ असे वेगवेगळे आवाज काढतो.

टिकटॉकवर झाले प्रेम; प्रेयसी समोर आली अन्...

संजना ऊर्फ सिद्धार्थने रवीला तीन वर्षांपासून प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. पण, गेल्या तीन वर्षांमध्ये संजना कधीही भेटली नाही. संजनाचा भाऊ म्हणून सिद्धार्थच भेटायला जाऊन पैसे घ्यायचा. शिवाय, वेगवेगळी कारण पुढे करून पैसे लुटत होता. तीन वर्षांमध्ये 50 लाख रुपये लुटल्याचा आरोप रवीने केला आहे.

होणाऱया पत्नीची प्रेम कहाणी वाचून आले डोळ्यात पाणी...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sanjana siddharth patel love story with jodhpur businessman ravi