'पद्मावती'च्या सेटवर संजय लिला भन्साळींना मारहाण

वृत्तसंस्था
शनिवार, 28 जानेवारी 2017

पद्मावती यांच्याबद्दल चित्रपटात चुकीच्या गोष्टी दाखविण्यात येत होत्या, अशी माहिती दुसरा आंदोलक विक्रम सिंग यांनी सांगितले. चित्रीकरण थांबविल्यानंतर चित्रपट निर्माते भन्साळी अन्य सदस्यांनी करणी सेनेच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि त्यांच्या मागणीवर विचार करण्याचे आश्‍वासन दिले.

जयपूर - 'पद्मावती' या चित्रपटात चुकीच्या गोष्टी दाखविण्यात येत असल्याच्या निषेधार्थ राजपूत गटाने दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. या कृत्याबद्दल बॉलिवूडमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या आहेत.

संजय लिला भन्साळी यांच्या ऐतिहासिक चित्रपट असलेला 'पद्मावती' चे चित्रीकरण थांबविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे जयगड किल्ल्यात उभारलेल्या सेटचेही नुकसान केले. या नुकसानीमुळे भन्साळी यांनी येथे चित्रीकरण न करण्याचा निर्णय घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. या चित्रपटात रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण हे काम करत आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण चालू असतानाच करणी सेनेचे कार्यकर्ते किल्ल्यावर जमले आणि त्यांनी आंदोलन करण्यास सुरवात केली. त्यांच्यातील काही जणांनी सेटचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला. या चित्रपटात दीपिका ही 'पद्मावती' आणि रणवीर 'अल्लाउद्दीन खिलजी' ची भूमिका करत आहे. 

चित्रपटात चुकीच्या गोष्टी घेतल्याबद्दल आपण निर्मात्यांच्या लक्षात आणून दिले होते; मात्र ते येथे चित्रीकरण करत असल्याचे लक्षात आल्यावर आम्ही येथे आंदोलनासाठी जमलो, असे करणी सेनेचे जिल्हाध्यक्ष नारायण सिंग यांनी सांगितले. पद्मावती यांच्याबद्दल चित्रपटात चुकीच्या गोष्टी दाखविण्यात येत होत्या, अशी माहिती दुसरा आंदोलक विक्रम सिंग यांनी सांगितले. चित्रीकरण थांबविल्यानंतर चित्रपट निर्माते भन्साळी अन्य सदस्यांनी करणी सेनेच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि त्यांच्या मागणीवर विचार करण्याचे आश्‍वासन दिले.

बन्साळी हे कलाकार आहेत. अशा कलाकाराचे संरक्षण देश करू शकत नाही. तर, त्या देशाला सोडचिठ्ठी देणे योग्य आहे. कोणताही कुत्रा, गाढव, माकड हा सेन्सॉरच्या अध्यक्षपदी बसू शकतो, हे पुन्हा सिद्ध झाले आहे.
- रामगोपाल वर्मा, दिग्दर्शक

संजय भन्साळी यांच्याविरोधात जे काही झाले त्याविरोधात आपण एकत्र आले पाहिजे. अशा लोकांना विरोध करण्यासाठी इंडस्ट्रीने पुढे येण्याची वेळ आली आहे.
- करण जोहर, दिग्दर्शक

देशात सध्या गुंडाराज सुरु आहे. संजय लिला भन्साळी यांच्याबाबत जे काही झाले, ते पाहून माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. हे खूपत धक्कादायक आहे.
- श्रेया घोषाल, गायक

Web Title: Sanjay Leela Bhansali Assaulted On Padmavati Sets in Jaipur