लोकशाहीवादी सोमनाथदा

संजय मिस्कीन 
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

डाव्या चळवळीचं बाळकडू घेतलेलं असतानाही कट्टर "लोकशाहीवादी' असं हे व्यक्तिमत्व म्हणजे सोमनाथदा. बोलपूर या लोकसभा मतदारसंघाचं दहा वेळा प्रतिनिधित्व करणारे सोमनाथदा यांचं तिथल्या जनतेतं एक अतूट नातं होतं.

डाव्या चळवळीचं बाळकडू घेतलेलं असतानाही कट्टर "लोकशाहीवादी' असं हे व्यक्तिमत्व म्हणजे सोमनाथदा. बोलपूर या लोकसभा मतदारसंघाचं दहा वेळा प्रतिनिधित्व करणारे सोमनाथदा यांचं तिथल्या जनतेतं एक अतूट नातं होतं.

सोमनाथदांचं वास्तव्य शांतिनिकेतनच्या बाजूलाच असलेल्या शास्त्रज्ञांच्या सोसायटीत होतं. अणुकराराच्या वेळी सभापतीपदाचा राजीनामा द्यावा, हा पॉलिटब्युरोचा निर्णय त्यांनी धुडकावला. कारण हे पद पक्षनिरपेक्ष असते, ही त्यांची तात्त्विक भूमिका होती. परिणामतः त्यांची पक्षातून हकालपट्टी झाली. 2009 च्या निवडणुकांनंतर ते त्यांच्या शांतिनिकेतनच्या घरात अगदी एकटेपणानं राहत होते. त्यातच 2011रोजी बंगालमध्ये डाव्या पक्षाच्या 35 वर्षाच्या सलग व एकहाती सत्तेला ममता बॅनर्जींच्या तृणमूल कॉग्रेसंने कडवं आव्हान उभे केले.

अशा काळात आयुष्यभर डाव्या विचारांची सोबत करणारे सोमनाथदा स्वस्थ कसे बसू शकतात, हा प्रश्‍न मनात आला. यासाठी त्यांनाच भेटायचं ठरवलं. ते भेटतील काय ? बोलतील काय, या शंकेचं काहूर मनात होतं. सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान, त्यांच्या सोसायटीच्या वॉचमनकडे व्हिजिटींग कार्ड पाठवले व त्यावर लिहिले "दादा सिर्फ दो मिनिट मिलना हैं'. त्यांनी आत बोलावले. बाहेरून दिसणारं भारदस्त व्यक्तिमत्व; पण जवळ गेल्यावर तेवढंच स्नेहाळ. "किसको इन्ट्रेस्ट है महाराष्ट्र मे बेंगाल के इलेक्‍शनमे?' त्यांचा सरळ प्रश्न... मी महाराष्ट्र व बंगालचं स्वातंत्रचळवळीपासून असलेलं भावनिक नातं सांगायचा प्रयत्न केला. " इन्टरव्ह्यू तो नही दे सकता. मुझे पार्टीसे निकाल दिया है. मै किसी भी पार्टी का नही हूँ. मै तो एक सामान्य आदमी हूँ.' त्यांनी थोड्या चढ्या आवाजातचं सुनावलं. "लेकिन दादा आपने बचपन से ही बंगाल की एवं देश की राजनिती नजदिकसे देखी है और आपकी कम्युनिस्ट पार्टी एक विचारधारा से जुटी पार्टी है. जिस बंगाल मे इस ग्लोबलायझेशन मे भी इस पार्टी की सरकार जनता चुनती है लेकिन इस बार कम्युनिस्ट की सरकार पहिली बार टेन्शन मे दिख रही है. क्‍या कारण है वह देश की सामान्य जनता और विश्‍लेषक जानना चाहते है, सरळ थेट न थांबता बोललो... " कहां कहा घुमे हो बंगाल में ?' त्यांचा सरळ प्रश्न... मी ज्या ज्या भागात फिरलो होतो त्या त्या शहरांची व गावांची नावे घेत गेलो... सोमनाथदा यांनी कुणाकुणाला भेटलास असे विचारले... मी तृणमलच्या व कम्युनिस्टांच्या जिल्हास्तरीय नेत्यांची नावं सांगितली. ते काहीसे सुखावले. माझी चौकशी केली. 
"बेटा मैं बोल सकता हूं लेकिन इन्टरव्हू नही दे सकता. बहुत सारे चॅनेल के लोग आकर गये हैं. मैने मना कर दिया है" त्यांनी निर्णय सांगावा त्या धाटणीत उत्तर दिलं. पण मी थोडासा आणखीन प्रयत्न म्हणून "दादा आपको ऐसा नही लगता की आप जिस पार्टीके साथ जिंदगीभर जुडे है उस पार्टी के लिए कुछ तो बोलना चाहिए ? ' यानंतर ते एकदम स्तब्ध झाले. भावुक स्वरात ते म्हणाले," हां... लगता तो है. मै मेरे चुनावक्षेत्र के लोगों को अपिल करूंगा.. व्होट फॉर सीपीएम...!! 

मी न थांबताय "कैसे करोगे ? रॅली करोंगे या क्‍या ?' 
"नही मै तो पार्टी के मंच पर नही जा सकता. पार्टी ने मुझे निकाल दिया है. मै एक अपिल लेटर निकालूंगा... और यह सिर्फ बोलपूर के लिएही सीमित होगा' या सर्व संभाषणातून सोमनाथ राजकिय शिष्टाचार व लोकशाही याबाबात किती परिपक्व होते ते जाणवले. पक्षानं काही मतभेदांसाठी त्यांची हकालपट्टी केलेली असली तरी आयुष्यभर त्यांनी पक्षनिष्ठा ढळू दिली नाही.

"एकांतात तळमळतोय डाव्यांचा भीष्माचार्य...!' 
दुसऱ्याच दिवशी सोमनाथदा यांनी जनतेला अपिल करणारं पत्रक काढलं ... अणि राष्ट्रीय ब्रेकिंग न्यूज झाली. त्यानंतर डाव्या पक्षाचे सर्व नेते त्यांना भेटयला धावले. मतभेद विसरले. सोमनाथदा प्रचारात सक्रिय झाले. पहिलीच सभा त्यांनी तत्कालिन मुख्यमंत्री बुध्ददेव भट्टाचार्य यांच्या जाधोवपूर मतदार संघात घेतली. 
लाल मतिर देश म्हणून ज्या बोलपुरची ओळख आहे. त्या बोलपुर मधल्या शांतिनिकेतन परिसरात "लाल सलाम व लाल निशाण' यासाठी आयुष्यभर लढणाऱ्या पण आयुष्याच्या उत्तरार्धात अबोल झालेल्या या महान लोकशाहीवादी डाव्या नेत्याला बोलतं केल्याचं समाधान पत्रकारितेतली एक "शिदोरी' म्हणून कायम सोबत राहील.

Web Title: sanjay miskin wrte about somnath chatterjee