शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल आणि एकही आत्महत्या होणार नाही याची खात्री देणार का? राऊतांचा सवाल

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 20 September 2020

कृषी विधेयकावरून राज्यसभेत सध्या चर्चा सुरु आहे. केंद्र सरकारकडून आणलेली ही विधेयकं शेतकऱ्यांवर अन्याय करणारी असल्याचं सांगत विरोधकांकडून याला विरोध केला जात आहे.

नवी दिल्ली: कृषी विधेयकावरून राज्यसभेत सध्या चर्चा सुरु आहे. केंद्र सरकारकडून आणलेली ही विधेयकं शेतकऱ्यांवर अन्याय करणारी असल्याचं सांगत विरोधकांकडून याला विरोध केला जात आहे. या विधेकयावरून एनडीएतील घटक पक्ष अकाली दलाने त्यांच्या एकमेव मंत्र्याचा राजीनामाही दिला. अकाली दलाच्या खासदार हरसिमरत कौर यांनी राजीनामा देत विधेयकाला विरोध केला. 

आता यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. संजय राऊत म्हणाले की, देशात 70 टक्के लोक शेतीशी संबंधित काम करतात. लॉकडाऊनमध्ये सगळं बंद असताना फक्त शेतकरी काम करत होते. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होईल आणि देशातील कोणताही शेतकरी आत्महत्या करणार नाही, याचं सरकार आश्वासन देऊ शकेल का? असा प्रश्नही राऊत यांनी पुढे बोलताना केला. सुरुवातीला या विधेकाला शिवसेनेने विरोध दर्शविला नव्हता. पण आता या विधेयकाला वाढता विरोध पाहता शिवसेनेने वेगळी भूमिका घेतल्याचे दिसत आहे.

corona updates: मागील 24 तासांत देशात सर्वाधिक कोरोना चाचण्या

 "पंतप्रधान मोदी म्हणाले होते की या विधेयकाबद्दल विनाकारण अफवा पसरविण्यात येत आहे. फक्त अफवावरूनच केंद्रीय मंत्र्यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा दिला का?" असंही राऊत राज्यसभेत बोलताना म्हणाले. कषी विधेयकावरून काँग्रेसनेही सरकारला चांगलंच घेरलं आहे. हे कृषी विधेयक म्हणजे शेतकऱ्यांचं डेथ वॉरंट असल्याचंही काँग्रेसने म्हटलं आहे. ' 

30 वर्षे एकट्याने खोदला कालवा; महिंद्राने ट्रॅक्टर भेट देऊन केला सन्मान

भाजप-एनडीएकडे राज्यसभेत आजही बहुमत नाही. सत्तारूढ भाजप आघाडीतील अकाली दलाने व तेलंगण राष्ट्र समितीसारख्या मित्रपक्षांनीही या विधेयकाला विरोध जाहीर केला आहे. अकाली दल (३ खासदार) वगळता भाजपला मदत करणाऱ्या एकाही पक्षाचा विरोध ठाम दिसत नाही. मात्र या विधेयकांवरून वाद केवळ एनडीएमध्ये आहेत असे नव्हे, कॉंग्रेस व तृणमूलच्या संसदीय नेत्यांमध्येही वाद पेटले आहेत. सप व द्रमुकसारखे कॉंग्रेसच्या बाजूने असणारे पक्षही राज्यसभेत कॉंग्रेसला नेहमीच अनुकूल भूमिका घेत नसल्याचे अनेकदा दिसले आहे. लोकसभेत सभात्याग करणाऱ्या शिवसेनेचे संजय राऊतांनी ठाम विरोधाची भूमिका घेतली आहे. बीजू जनता दल, बसप व तेलंगण राष्ट्र समितीची विरोधाची भूमिका असली तरी हे पक्ष सभात्यागाचा मार्गानेच जाऊ शकतात असे सांगितले जाते. 

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sanjay raut asked question on krishi bill in rajyasabha