esakal | शिवरायांच्या वंशजांनो बोला, हे मान्य आहे का? संजय राऊत यांचा प्रश्न
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut targets udayanraje and Sambhajiraje over aaj ke shivaji narendra modi Book

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी केलेली तुलना महाराजांच्या वंशजांना मान्य आहे का? असा प्रश्‍न करीत वंशजानों बोला काही तरी बोला, असे आव्हान शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी दिले आहे. 

शिवरायांच्या वंशजांनो बोला, हे मान्य आहे का? संजय राऊत यांचा प्रश्न

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी केलेली तुलना महाराजांच्या वंशजांना मान्य आहे का? असा प्रश्‍न करीत वंशजानों बोला काही तरी बोला, असे आव्हान शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी दिले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारतीय जनता पार्टीच्या दिल्लीतील कार्यालयात "आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या प्रकाशनाची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर देशभरातून कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेने टीका केली आहे.

शिवसेनेचे दिल्लीतील माजी पदाधिकारी जय भगवान गोयल यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे. या पुस्तकात पंतप्रधान मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर करण्यात आली आहे.या प्रकारे पंतप्रधान मोदी यांच्या महाराजांबरोबर कशी तुलना होऊ शकते हा टीकेचा मुख्य रोख आहे. खासदार राऊत यांनी या संदर्भात ट्विट करून विरोध केला आहे. 

'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' पुस्तक प्रकाशनावरून विरोधक आक्रमक

या पुस्तकाचे लेख न करणाऱ्या गोयल यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनावर हल्ला केला होता. त्यानंतर त्यांना शिवसेनेतील निलंबित करण्यात आले होते. अशा व्यक्तीने लिहिलेले पुस्तक आणि त्यात महाराजांची अशाप्रकारे केलेली तुलना शिवाजी महाराजांच्या वंशजांना मान्य आहे का ? असा प्रश्‍न खासदार राऊत यांनी केला आहे. या संदर्भात छत्रपती उदयनराजे व छत्रपती शिवेंद्रराजे यांनी भूमिका घ्यायला हवी, अशी अपेक्षा राऊत यांनी व्यक्त केली आहे.