Sanjay Raut: स्वा. सावरकरांच्या वादानंतर संजय राऊत भारत जोडो यात्रेत सहभागी होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut

Sanjay Raut: स्वा. सावरकरांच्या वादानंतर संजय राऊत भारत जोडो यात्रेत सहभागी होणार

भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी स्वा. सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातलं राजकारण चांगलचं तापलं होतं. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या माफीनाम्यावरून राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती.

दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे लवकरच भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहे. याबाबतची माहिती स्वत: खासदार संजय राऊत यांनी बोलताना दिली आहे. मध्यप्रदेश किंवा काश्मीरमध्येच समारोपादरम्यान भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होण्याचा आपला प्रयत्न असेल, असे संजय राऊत यांनी सांगितले आहे. दिल्लीमध्ये माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली आहे.

हेही वाचा: Sanjay Raut : ‘भारत जोडो’ यात्रेत माणुसकी

तब्बल 103 दिवस तुरुंगात राहून परतल्यानंतर खासदार संजय राऊत काल (सोमवारी) पहिल्यांदाच दिल्लीला गेले होते. राज्यसभेमध्ये खासदार असलेल्या संजय राऊत यांचे सफदरजंग लेन येथील त्यांच्या निवासस्थानी दिल्लीतील शिवसेना कार्यकर्त्यांनी फटाके उडवून आणि पुष्पवृष्टी करून जोरदार स्वागत करण्यात आलं. दरम्यान संजय राऊत यांनी राजकीय विषयांवर भाष्य यावेळी त्यांनी टाळलं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी राहुल गांधींच्या टिकास्त्राच्या पार्श्वभूमीवर सावरकर आपलेच आहेत, या भूमिकेचा राऊत यांच्याकडून यावेळी पुनरुच्चार करण्यात आला आहे.

हेही वाचा: Sanjay Raut: 'भारत जोडो यात्रे'त सामील होणार राऊत? सुटकेनंतर काँग्रेसकडूनही स्वागत

बोलताना राऊत यांनी सांगितलं की, संजय राऊत यांनी तुरुंगवासातून मुक्ततेनंतर कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी फोन करून विचारपूस केली. सोबतच, भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होण्याचाही मानस त्यांनी यावेळी बोलून दाखवला. महाराष्ट्रानंतर राहुल गांधींची भारत जोडो यात्रा आता मध्यप्रदेशात जाणार आहे. तर राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश यासारख्या राज्यांनंतर अखेर काश्मीरमध्ये श्रीनगरमध्ये यात्रेचा समारोप होणार आहे.

हेही वाचा: Bharat Jodo Yatra: काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत छोट्या पडद्यावरील कलाकारही सामील

राऊत पुढे म्हणाले की, मध्यप्रदेशात किंवा काश्मीरमध्येच समारोपादरम्यान भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होण्याचा आपला प्रयत्न असेल, असं राऊत यांनी सांगितलं आहे. भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात असताना राहुल गांधींसमवेत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे सहभागी झाले होते. असे असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या माफीनाम्यावरून राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती. अशा प्रकारची विधाने महाविकास आघाडीमध्ये फुटीस कारणीभूत ठरतील, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला होता.

टॅग्स :Rahul GandhiSanjay Raut