संजीव त्यागी, गौतम खेतान यांना जामीन

पीटीआय
गुरुवार, 5 जानेवारी 2017

गेल्या काही दिवसांपूर्वी न्यायालयाने या प्रकरणात अटकेत असलेले एस. पी. त्यागी यांना जामीन दिला होता. मात्र संजीव त्यागी आणि गौतम खेतान यांच्या जामिनावरील निर्णय 4 जानेवारीपर्यंत स्थगित केला होता.

नवी दिल्ली - ऑगस्टा वेस्टलॅंड हेलिकॉप्टर खरेदी गैरव्यवहारप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने संजीव त्यागी आणि गौतम खेतान यांना आज जामीन मंजूर केला. न्यायालयाने त्यागी आणि खेतान यांना कोणत्याही साक्षीदारांना भेटण्यास आणि परवानगी घेतल्याशिवाय दिल्ली सोडण्यास मनाई केली आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी न्यायालयाने या प्रकरणात अटकेत असलेले एस. पी. त्यागी यांना जामीन दिला होता. मात्र संजीव त्यागी आणि गौतम खेतान यांच्या जामिनावरील निर्णय 4 जानेवारीपर्यंत स्थगित केला होता. सीबीआयने त्यागी यांच्या जामीनअर्जाला विरोध करत ज्या चौकशीबाबत दावे केले होते त्यावर न्यायालयाने प्रश्‍न उपस्थित केले. त्यागींसह अन्य जणांवर ब्रिटनच्या ऑगस्टा वेस्टलॅंड कंपनीच्या 12 डब्ल्यू-101

व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर खरेदी व्यवहारात झालेल्या गैरप्रकारात सहभागी झाल्याचा आरोप आहे.

Web Title: Sanjiv Tyagi gets bail