संतीबस्तवाड येथील ग्रामपंचायत माजी सदस्याचा बैलूरजवळ खून

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 मे 2019

एक नजर

  • संतीबस्तवाड ( जि. बेळगाव) येथील माजी ग्राम पंचायत सदस्याचा धारदार शस्त्राने वार करून खून
  • नागप्पा भीमा जिद्दीमनी (वय 45) असे मृताचे नाव. 
  • हा खून पूर्ववैमनस्यातून झाल्याचा संशय. 

खानापूर -  संतीबस्तवाड ( जि. बेळगाव) येथील माजी ग्राम पंचायत सदस्याचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला आहे. नागप्पा भीमा जिद्दीमनी (वय 45) असे त्यांचे नाव असून हा खून पूर्ववैमनस्यातून झाल्याचा संशय आहे.  गुरुवारी (ता.30) रात्री ही घटना घडली. 

याबाबत पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी, नागप्पा यांना चोर्ला महामार्गावरील बैलूर फाट्यावर बोलवून अनोळखी व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला. ते जखमी अवस्थेत पडल्याचे पाहून प्रवाशांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहचेपर्यंत ते ठार झाले होते. खानापूर पोलिसात घटनेची नोंद झाली असून पोलीस निरीक्षक मोतीलाल पवार अधिक तपास करीत आहेत. अद्याप या प्रकरणी कुणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Santibastwad Grampanchayat EX- Member murder in Bailur