संत्रागाची-पुणे हमसफर येत्या 11 ऑगस्टपासून 

पीटीआय
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

कोलकता : संत्रागाचीहून पुणे आणि जबलपूरसाठी लवकरच दोन हमसफर एक्‍स्प्रेस गाड्या सुरू होणार असल्याची माहिती अग्नेय रेल्वेच्या प्रवक्‍त्याने आज दिली. या गाड्या आठवड्यातून एकदा धावतील. जबलपूरसाठीची गाडी आठ ऑगस्टला, तर पुण्यासाठीची गाडी 11 ऑगस्टपासून सुरू होईल, अशी माहिती अग्नेय रेल्वेचे प्रवक्ते संजय घोष यांनी दिली. 

संत्रागाची-पुणे एक्‍स्प्रेस 

संत्रागाची-पुणे हमसफर एक्‍स्प्रेस दर शनिवारी सायंकाळी 6.25 वाजता निघेल आणि सोमवारी पहाटे 02.45 वाजता पुण्यात पोचेल. पुण्याहून ही गाडी दर सोमवारी सकाळी 10.30 वाजता सुटेल आणि संत्रागाचीला दुसऱ्या दिवशी सायंकाळी 6.15 वाजता पोचेल. या गाडीला 16 थ्री टियर वातानूकुलित डबे असतील. खड्‌गपूर- टाटानगर- चक्रधरपूर- झारसुगुडा- बिलासपूर- रायपूर- दुर्ग- गोंदिया- नागपूर- भुसावळ- कल्याणमार्गे ही गाडी धावेल. 

संत्रागाची-जबलपूर एक्‍स्प्रेस 

ही गाडी संत्रागाचीतून दर बुधवारी रात्री 8.55 वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 3.55 वाजता जबलपूरला पोचेल. जबलपूरहून ही गाडी दर गुरुवारी रात्री 8.55 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी 4.55 वाजता संत्रागाचीला पोचेल. ही गाडी खड्‌गपूर- टाटानगर- राऊरकेला- झारसुगुडा- रायगड- बिलासपूर- शहडोल आणि कटनी साउथ या मार्गाने धावेल. या गाडीला 16 थ्री टियर वातानूकुलित डबे आणि दोन लगेज व्हॅन असतील. 

Web Title: Santragachi Pune Hamasafar coming from August 11