एक रुपयात साडीसाठी महिलांची झुंबड

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

बिदर (कर्नाटक) - साड्यांच्या दुकांनात सूट जाहिर झाली आणि तेथे महिलामंडाळाने खरेदीसाठी गर्दी केली नाही तर नवलच. बिदरमधील एका दुकानदाराने एक रुपयात साडी देण्याची योजना राबविली आणि महिलांची दुकानात झुंबडच उडाली. नोटबंदीच्या निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी आपण ही योजना राबविली असल्याचे बिदर येथील दुकानदार पासर्गे यांनी म्हटले आहे.

असे असले तरी, एक रुपयात साडी करण्यासाठी मात्र एक अट ठेवण्यात आली आहे. एक रुपयाची नोट घेऊन या आणि साडी घेऊन जा अशी ही योजना आहे. त्यामुळे एक रुपयाच्या नोटेची मागणी वाढली आहे.

एक रुपयात मिळणाऱ्या या साड्यांची किंमत ही शंभर रुपये आहे. परंतु, नोटबंदीच्या निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी आपण तोटा सहन करुन साडी एक रुपयातच देणार असल्याचे दुकानदार पासर्गे यांनी म्हटले आहे. अशा प्रकारे आपण एक लाख साड्यांची व्रिक्री करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

दरम्यान, साडी खरेदी करण्यासाठी झालेल्या महिलांच्या गर्दीमुळे, नियंत्रणासाठी पोलिसांना बोलवावे लागले असल्याची माहिती एका इंग्रजी वृत्तपत्राने दिली आहे.

Web Title: A saree for a rupee to ‘celebrate demonetisation’