सरताज अझीझ यांनी माझ्या पत्राची दखलही घेतली नाही: स्वराज

वृत्तसंस्था
सोमवार, 10 जुलै 2017

अझीझ यांना मी कुलभूषण जाधव यांच्या आई अवंतिका जाधव यांना व्हिसा मिळण्यासाठी पत्र लिहिले होते. पण, त्यांनी साधे त्याचे उत्तरही दिले नाही. भारतात उपचारासाठी येणाऱ्या प्रत्येक पाकिस्तानी नागरिकाबद्दल मला सहानुभूती आहे.

नवी दिल्ली - भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री सरताज अझीझ यांच्यावर जोरदार टीका करत कुलभूषण जाधव यांच्या आईला पाकिस्तानचा व्हिसा मिळण्यासाठी अनेकवेळा पत्र लिहूनही अझीझ यांनी दखल न घेतल्याचे म्हटले आहे.

कर्करोगग्रस्त पाकिस्तानी महिलेला भारताने व्हिसा नाकारल्याने त्या महिलेने सुषमा स्वराज यांना ट्विट केले होते. या ट्विटवरून चर्चा होत असताना आता सुषमा स्वराज यांनी आज (सोमवार) सलग नऊ ट्विट करत पाकिस्तानकडून कशाप्रकारे आपल्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, याबाबतची माहिती दिली आहे. पाकिस्तानी सैन्याने बलुचिस्तानमधून अटक करण्यात आलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना फाशीची सुनाविण्यात आली आहे. भारताने अनेकवेळा पाकिस्तानशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण पाकिस्तानने त्यांना एकदाही संपर्क करू दिलेला नाही.

सुषमांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, की अझीझ यांना मी कुलभूषण जाधव यांच्या आई अवंतिका जाधव यांना व्हिसा मिळण्यासाठी पत्र लिहिले होते. पण, त्यांनी साधे त्याचे उत्तरही दिले नाही. भारतात उपचारासाठी येणाऱ्या प्रत्येक पाकिस्तानी नागरिकाबद्दल मला सहानुभूती आहे. मला विश्वास आहे, की सरताज अझीझ पण त्यांच्या देशातील नागरिकांविषयी विचार करतील. पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा मिळण्यासाठी आम्हाला फक्त त्यांच्या शिफारशीची गरज असते. त्यांच्या शिफारशीचे पत्र असेल तर प्रत्येक पाकिस्तानी नागरिकाला व्हिसा दिला जाईल. 

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
पुणे: चारित्र्याच्या संशयावरून पत्नी व मुलाची हत्या​
तांत्रिक कारणामुळे 'एनएसई'वरील व्यवहार बंद
नौगाम सेक्टरमध्ये चकमकीत 2 दहशतवादी ठार
बोट बुडण्यापूर्वी फेसबुकवर केले Live; दोघांचा मृत्यू, 6 बेपत्ता
डेक्कन क्वीनला 1 तास उशीर; प्रवाशांचे आंदोलन
ड्रॅगनची नजर ‘कोंबडीच्या माने’वर​
पुरुषाने दिला मुलीला जन्म​
सिन्नर तालुक्यात शाळकरी मुलीची गळफास घेऊन आत्महत्या​
भूमाफियांमुळे नेवाळी आंदोलनाला हिंसक वळण- आमदार गायकवाड​

मुजोर रिक्षाचालकांविरोधात डोंबिवलीकरांचे 'प्रोटेक्ट अगेन्स्ट रिक्षावाला“
बिल्डर जगदीश वर्मा हत्या प्रकरण; आरोपीची पुराव्याअभावी मुक्तता​
विंडिजकडून भारताचा दारुण पराभव; लुईसचे शतक​

Web Title: Sartaj Aziz did not acknowledge my letter seeking visa for Kulbhushan Jadhav’s mother: Sushma Swaraj