शशिकलाच्या शेजारणीची दुसऱया कारागृहात रवानगी

वृत्तसंस्था
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

बंगळूर- अण्णाद्रमुकच्या सरचिटणीस व्ही. के. शशिकला यांची कारागृहातील शेजारीण सायनाइड मल्लिका ऊर्फ के. डी. केपाम्माला हिची उत्तर कर्नाटकमधील हिंदालगा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवलेल्या शशिकला यांना पाराप्पाना आग्रहारा मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे. शशिकला यांच्या बराकीशेजारी सायनाइड मल्लिका शेजारील बराकमध्ये ठेवण्यात आले होते. यासंबंधीचे वृत्त प्रसारीत झाल्यानंतर शशिकला यांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव मल्लिकाला हिंदालगा कारागृहात हलविण्यात आले आहे.

सायनाइड मल्लिका हिची जगातील पहिली महिला सिरीयल किलर म्हणून ओळख आहे. तिने सहा महिलांची हत्या केली आहे. तिची हत्या करण्याची वेगळी पद्दधत होती. मंदिरात जाणाऱया श्रीमंत महिलांसोबत मैत्री करून त्यांच्या अंगावरील दागिने काढून घ्यायची. सन 2008 मध्ये तिला अटक करण्यात आली आहे.

मल्लिका व शशिकलाची मैत्री झाली होती. शशिकलाला जेवणाच्या रांगेत उभे राहू न देता ती स्वत: शशिकलासाठी जेवण घेऊन येत होती. परंतु, मल्लिकाला काही न सांगता बॅग भरण्यास सांगितले व तिची हिंदालगा कारागृहात रवानगी करण्यात आली, अशी माहिती कारागृहातील सूत्रांनी दिली.

Web Title: Sasikala neighbour 'Cyanide' Mallika shifted