....तर शशिकला आणखी 13 महिने तुरुंगात

पीटीआय
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

शशिकला व त्यांच्या नातेवाईकांना जेलमधील इतर कैद्यांप्रमाणेच वागणूक देण्यात येत असून तुरुंगामध्ये रांधलेले अन्नच त्यांना सेवनासाठी देण्यात येत असल्याचे कुमार यांनी स्पष्ट केले आहे

बंगळूर - आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी शिक्षा सुनाविण्यात आलेल्या एआयएडीएमके पक्षाच्या नेत्या शशिकला यांनी सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिल्याप्रमाणे 10 कोटी रुपयांचा दंड न भरल्यास त्यांना आणखी 13 महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे. येथील तुरुंग अधीक्षक कृष्ण कुमार यांनी एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली.

शशिकला व त्यांच्या नातेवाईकांना सुनाविण्यात आलेल्या चार वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाने गेल्या 14 फेब्रुवारीस शिक्कामोर्तब केले. यानुसार, आता शशिकला यांना तीन वर्षे व 11 महिने तुरुंगवास भोगावा लागणार आहे. मात्र दंड न भरल्यास त्यामध्ये आणखी 11 महिन्यांची भर पडणार आहे.

शशिकला व त्यांच्या नातेवाईकांना जेलमधील इतर कैद्यांप्रमाणेच वागणूक देण्यात येत असून तुरुंगामध्ये रांधलेले अन्नच त्यांना सेवनासाठी देण्यात येत असल्याचे कुमार यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Sasikala will have to serve 13 more months in jail if she doesn’t pay Rs 10 crore fine