यूकेचे पंतप्रधान करु शकतात मग माेदी का नाही? पृथ्वीराज चव्हाण

सिद्धार्थ लाटकर | Thursday, 3 September 2020

पंतप्रधान मोदींनी आगामी संसद अधिवेशनात प्रश्नोत्तराचा तास रद्द केल्याचा खेद चव्हाण यांनी केला आहे.

सातारा : आंतरराष्ट्रीय संसदीय संघटनेच्या (आयपीयू) आकडेवारीनुसार 105 देशांमधील संसदेचे कामकाज काेविड 19 च्या काळात देखील सुरु राहिले. मात्र केवळ रशिया आणि भारतातील संसदेत आजपर्यंत एकही सभा घेतली गेली नाही. खरं तर पंतप्रधान नरेंद्र माेदींना विराेधकांंशी सामना करायचा नाहीये अशी टीका काॅंग्रेसचे ज्येष्ठ आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.  

चव्हाण यांनी केलेल्या ट्विटमध्ये संविधानाच्या अनुच्छेद 85 ने संसदेला शेवटच्या बैठकीनंतर सहा महिन्यांच्या आत बैठक घेणे अनिवार्य केले आहे. संसद 23 मार्च रोजी बंद झाली आणि 22 सप्टेंबरपूर्वी बैठक होणे आवश्‍यक आहे. अनिच्छेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 सप्टेंबर रोजी संसद बोलावली आहे असे नमूद केले आहे. 

आंतरराष्ट्रीय शॉर्टफिल्म फेस्टिव्हलमध्ये सातारकराचा झेंडा 

पंतप्रधान मोदींनी आगामी संसद अधिवेशनात प्रश्नोत्तराचा तास रद्द केल्याचा खेद चव्हाण यांनी केला आहे. ते म्हणतात, प्रश्नोत्तराचा तास रद्द करणे उचित नाही. काेविड 19 च्या उद्रेकानंतर यूकेचे पंतप्रधान बोरिस जॉनसन हे पंतप्रधानांच्या प्रश्नोत्तराचा उपक्रमात सहभागी झाले. ते सर्वसामान्यांच्या प्रश्नांना सामाेरे गेले. पंतप्रधान नरेंद्र मोंदीना मात्र विराेधकांकडून कसलीही छाननी नकोय अशी टीका आमदार चव्हाण यांनी केली आहे. 

कऱ्हाडात जुगाराचे क्‍लब लागले वाढू; तीनपानीला पसंती