
'देशातील पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले तरच, सर्वसामांन्याना दिलासा मिळेल'
राज्यपाल सत्यपाल मलिकांचं भाजपला अडचणीत आणणारं वक्तव्य
राज्यासह देशाच्या राजकारणात सातत्याने अनेक घडामोडी घडत आहेत. भाजपा आणि कॉंग्रेससह इतर राज्यकर्ते बऱ्याच वेळा काही वादग्रस्त वक्तव्य करत असतात. दरम्यान, आता मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक (satyapal malik) यांनीही असचं एक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राज्यपाल यांचं हे विधान पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि भाजपला अडचणीत आणणारं का ? अशी चर्चा रंगली आहे. पंतप्रधान मोदी (PM Modi) गहू एक्सपोर्टची गोष्ट करतात, गहू काय पीएम मोदींचा आहे का?, असा सवाल मलिक यांनी केला आहे. तसेच, मुकेश अंबानी आणि गौतम अदानी हे मोदींचे दोस्त असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. हनुमानगढच्या संगरिया येथील एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. (satyapal malik controversial statement against bjp and pm modi)
हेही वाचा: ''झिका व्हायरस धोकादायक उद्रेकाच्या उंबरठ्यावर''
यावेळी ते म्हणाले, देशातील पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले पाहिजेत. तरच, सर्वसामांन्याना दिलासा मिळणार आहे. जम्मू काश्मीरच्या राज्यपालपदी असताना कोट्यवधी रुपयांच्या लाच देण्याच्या ऑफर मला आल्या होत्या. मात्र सीबीआयने (CBI) विचारणा केल्यास मी लाचेची ऑफर देणाऱ्यांची नावे सांगण्याचा, इशाराच सत्यपाल मलिक यांनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदींना मी हे सांगितल्यानंतर त्यांनी याचं समर्थन केलं आणि भ्रष्टाराच्या बाबतीत कोणतीही तडजोड होता कामा नाही असेही मलिकांनी सांगितले आहे. उत्तर प्रदेशात (UP Election) भाजपला जिंकून देण्यासाठी बसपने मोठी मदत केली. भाजप (BJP) स्वबळावर निवडणूक जिंकत नव्हती, असा गौप्यस्फोटही मलिक यांनी केला आहे. शेतकरी आंदोलन पुन्हा होणार आहे, एमएसपी हा शेतकऱ्यांचा हक्क असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा: जसा उंच असतो ढोंगा, बरा नाही भोंगा; आठवलेंचा कवितेतून ठाकरेंना टोला
दरम्यान, मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहिले आहेत. तसेच कृषी कायद्यासह अनेकविध मुद्द्यांवरून केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर मलिक सातत्याने निशाणा साधतानाही दिसत आहेत. यापूर्वी जोधपूर येथील एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना थेट टक्कर देऊ शकतो, असे सत्यपाल मलिक यांनी म्हटले होते.
Web Title: Satya Pal Malik Controversial Statement Against Bjp And Pm Modi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..