ज्येष्ठ नेते सत्यदेव कटारे यांचे निधन

पीटीआय
गुरुवार, 20 ऑक्टोबर 2016

भोपाळ - मध्य प्रदेशचे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, विरोधी पक्ष नेते सत्यदेव कटारे (वय 61) यांचे दीर्घ आजाराने आज मुंबईत निधन झाले. कटारे यांच्यावर मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मध्य प्रदेशच्या भिंड जिल्ह्याच्या अटेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सत्यदेव कटारे हे उपचारासाठी न्यूयॉर्कलादेखील गेले होते. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. मात्र, त्यांची प्रकृती पुन्हा बिघडल्याने त्यांना मुंबईच्या हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सत्यदेव कटारे यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1955 रोजी झाला होता.

भोपाळ - मध्य प्रदेशचे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, विरोधी पक्ष नेते सत्यदेव कटारे (वय 61) यांचे दीर्घ आजाराने आज मुंबईत निधन झाले. कटारे यांच्यावर मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मध्य प्रदेशच्या भिंड जिल्ह्याच्या अटेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सत्यदेव कटारे हे उपचारासाठी न्यूयॉर्कलादेखील गेले होते. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. मात्र, त्यांची प्रकृती पुन्हा बिघडल्याने त्यांना मुंबईच्या हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सत्यदेव कटारे यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1955 रोजी झाला होता. आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरवात त्यांनी युवक कॉंग्रेसमधून केली होती.

Web Title: satyadev katare pass away