सत्यविजय नाईक यांची भाजपात घरवापसी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

चार वर्षापूर्वी जिल्हा पंचायत निवडणुकीत उमेदवारी डावलल्याने नाईक यांनी भाजपच्या नावेली मंडळाच्या अध्यक्षपदाचा त्याग करून भाजप पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती.

मडगाव : मागच्या विधानसभा निवडणुकीतील महाराष्ट्र गोमंतक (मगो) चे नावेलीचे उमेदवार व नावेली मतदारसंघ समितीचे अध्यक्ष सत्यविजय नाईक यांनी घरवापसी करताना आज आपल्या सुमारे तीनशे कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला. 

मडगाव येथील दक्षिण गोवा भाजप कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात गोव्याचे मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी नाईक व त्यांच्या कार्यकर्त्यांचे भाजपात स्वागत केले. यावेळी भाजपचे राज्य सरचिटणीस सदानंद तानावडे, दक्षिण गोवा सरचिटणीस उल्हास तुयेकर व रुपेश महात्मे, प्रवक्ते शर्मदर रायतूरकर, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष शेख जीना, मडगाव मंडळ अध्यक्ष सुबोध गोवेकर, नावेली मंडळ अध्यक्ष दामोदर नाईक, दिकरपाल दवर्लीचे पंच परेश नाईक उपस्थित होते.

चार वर्षापूर्वी जिल्हा पंचायत निवडणुकीत उमेदवारी डावलल्याने नाईक यांनी भाजपच्या नावेली मंडळाच्या अध्यक्षपदाचा त्याग करून भाजप पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. नावेली मतदारसंघातून 2017 ची विधानसभा निवडणूक त्यांनी मगोच्या उमेदवारीवर लढवली होती. 

Web Title: Satyavjay Naik came again in the BJP