'थोडा उशिर झाला असता तर किडनी झाली असती फेल'

वृत्तसंस्था
सोमवार, 18 जून 2018

गृहमंत्री सत्येंद्र जैन यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांनी रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणखी थोडा उशिर झाला असता तर त्यांची किडनी निकामी झाली असती, असे आपचे नेते आशिष खेतान यांनी सांगितले.

नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह तीन मंत्री हे दिल्लीच्या नायब राज्यपालांच्या निवासस्थानी धरणे आंदोलन करत आहेत. केजरीवालांसह उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया, गृहमंत्री सत्येंद्र जैन, कामगार मंत्री गोपाळ राय हे ही राजनिवासात धरणे करत आहेत. परंतु, गृहमंत्री सत्येंद्र जैन यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांनी रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणखी थोडा उशिर झाला असता तर त्यांची किडनी निकामी झाली असती, असे आपचे नेते आशिष खेतान यांनी सांगितले.

 

आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आशिष खेतान यांनी सांगितले की, मी आज सकाळी सत्येंद्र जैन यांची प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी गेलो असता, डॉंक्टरांनी सांगितले की, आणखी थोडा उशिर झाला असता, तर सत्येंद्र जैन यांची किडनी निकामी झाली असती. 

Web Title: satyendra jain admitted in hospital