इंडियन बुल फ्रॉगला वाचवा

indien-bull-frog.jpg
indien-bull-frog.jpg

 पणजी : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही राज्याला मान्सून चांगल्या प्रमाणात सुखावणार आहे. पावसाचा फायदा निसर्गातील सर्व घटकांसह प्राण्यांना आणि वनस्पतींनाही होतो. बेडूक आणि टोड्‌ससाठी या जातींसाठी हा महत्त्वाचा ऋतू समजला जातो. राज्यात आढळणाऱ्या इंडियन बुल फ्रॉग जातीच्या बेडकांना पकडणे गेल्या अनेक दशकांपासून दरवर्षी ठरलेल्या कार्यक्रमाप्रमाणे झाले आहे. या बेडकांना पकडण्यासाठी कायद्यानुसार सुमारे पंचवीस हजार रुपयांचा दंड असला तरी त्यांना पकडले जाते. इंडियन बुल फ्रॉग हा अन्नसाखळीतील एक महत्त्वाचा भाग असून त्याला जतन करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे, असे आवाहन पर्यावरणतज्ज्ञ निर्मल कुलकर्णी यांनी केले आहे. 

जंपिंग चिकन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या बेडकाला अनेक लोक पकडून खातात. नद्या, तळी, डबकी, झऱ्यांसारख्या अनेक जलविषयक जैवविवधतेचा इंडियन बुल फ्रॉग महत्त्वाचा घटक आहेत. याशिवाय इंडियन बुल फ्रॉग पावसाळ्यात उत्कृष्ट कीटक नियंत्रक म्हणून काम करतो. पावसाळ्यात वाढणाऱ्या डासांना कमी करण्यात त्यांचा वाटा मोठा असल्याने त्यांचे संवर्धन आवश्‍यक आहे. आपल्या आजूबाजूला इंडियन बुल फ्रॉगला पकडण्याबाबतचे काही प्रकार घडत असल्यास त्याची कल्पना राज्याच्या वन खात्याला द्यावी, असेही आवाहनही कुलकर्णी यांनी केले आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com