
- इएमव्ही चिप असलेले कार्ड राहणार सुरु
- आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी निर्णय
नवी दिल्ली : भारतीय स्टेट बँकेत (एसबीआय) खाते असणाऱ्या खातेदारांचे डेबिट कार्ड बंद होणार आहेत. त्यामुळे खातेदारांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी आता एसबीआयने आपल्या खातेधारकांसाठी एक सूचना जारी केली आहे. कार्ड बदलण्यासाठी खातेरादांनी बँकेशी त्वरीत संपर्क साधावा, असे आवाहन यामधून करण्यात आले आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
इएमव्ही चिप असलेले कार्ड राहणार सुरु
सध्या सुरु असलेल्या मॅग्नेटिक स्ट्राइप डेबिट कार्डचा वापर कसा करता येईल, याचा प्रयत्न सुरु आहे. 1 जानेवारी, 2020 पासून फक्त इएमव्ही चिप आणि पिन असणाऱ्या कार्डचाच वापर केला जाणार आहे. मात्र, मॅग्नेटिक स्ट्राइप डेबिट कार्ड बंद केले जाणार आहेत.
सरकारकडून धार्मिक व सामाजिक ऐक्यास धोका : शरद पवार
आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी निर्णय
आर्थिक फसवणुकीला आळा बसावा, यासाठी आरबीआयकडून अशा स्वरूपाची कडक पावले उचलली जात आहे. नव्या ग्राहकांसाठी इएमव्ही चिप असणारे डेबिट कार्ड दिले जात आहे.
असे बदला कार्ड
आपल्याकडील जुने कार्ड असेल तर ते बदलण्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. इंटरनेट बँकिंग, योनो ऍप किंवा बँकेच्या शाखेत जाऊन कार्ड बदलता येऊ शकते.
नवे कार्ड नि:शुल्क
जर संबंधित खातेदाराला बँकेकडून यासाठी कोणतेही शुल्क आकारले गेले तर त्यासाठी पैशांच्या परताव्याची (रिफंड) मागणी केली जाऊ शकते.