एसबीआयची मोबाईल चार्जिंग संदर्भात महत्त्वाची सूचना; होऊ शकते डेटा चोरी!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

चार्जिंग केबलमधून होऊ शकते डाटा चोरी

- मोबाईलमध्ये पासबुक, एटीएमचा फोटोही ठेऊ नका

नवी दिल्ली : आपण अनोळख्या ठिकाणी असल्यास मोबाईलची बॅटरी डाऊन झाली तर मोठी अडचण होते. संपर्काचे पर्याय काही प्रमाणात बंद पडतात. मात्र, त्यावेळी आपण इतर ठिकाणी मोबाईल चार्जिंगला लावतो. पण हे करणं तुम्हाला चांगलेच महागात पडू शकते. आपल्या खात्यात असलेली रक्कम गायब करता येऊ शकते. याबाबतच्या सूचना देणारे पत्रकच भारतीय स्टेट बँकेकडून जारी करण्यात आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सध्या विविध बँकेत गैरव्यवहार होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बँकांकडून सुरक्षेच्या कारणास्तव काळजी घेण्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर आता देशातील सर्वांत मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने सावधगिरी बाळगण्याचे सांगितले आहे. गैरव्यवहार हा फक्त एटीएमच्या माध्यमातून होत नाही तर मोबाईल हॅक करूनही करता येऊ शकतो. आपण अनेकदा विमानतळ, रेल्वे स्थानक, रेल्वे आणि हॉटेलमध्ये मोबाईल चार्जिंग करतो. पण हे करताना आपले मोबाईल अकाऊंट रिकामे होऊ शकते.

आता मंत्रालयाचे कामकाज दररोज सुरू राहणार

याबाबतच्या सूचना एसबीआयने दिल्या आहेत. त्यामध्ये बँकेने सांगितले, की कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी मोबाईल फोन चार्जिंगला लावण्यापूर्वी विचार करावा. मालवेअरच्या माध्यमातून आपल्या फोनमधील डाटा चोरला जाऊ शकतो. त्यामुळे हॅकर्सला पासवर्ड आणि डाटा एक्सपोर्ट करण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे अशाप्रकारच्या कोणत्याही अनोळखी ठिकाणी मोबाईल चार्जिंगला लावू नये. 

No photo description available.

चार्जिंग केबलमधून होऊ शकते डाटा चोरी

बँकेने सांगितले, की आपला मोबाईल 'जूस हॅकिंग'चा शिकार होऊ शकतो. यामध्ये मोबाईलच्या चार्जिंग केबलमधून मोबाईलमधील खासगी डाटा हॅकर्सला सहजपणे मिळू शकतो. त्यामुळे बँकेतून आपली आयुष्यभराची कमाई गायब केली जाऊ शकते. तसेच डाटा कनेक्शन आणि यूएसबीच्या माध्यमातून हॅकर्स आपल्या फोनमध्ये मालवेअर इन्स्टॉल करू शकतात. त्यामुळे हॅकर्स आपल्या मोबाईलमधील डाटा कॉपी करू शकतात. अशाप्रकारे खात्यातून रक्कम काढता येऊ शकते. 

मोबाईलमध्ये पासबुक, एटीएमचा फोटोही ठेऊ नका

जर आपण आपला बँक अकाऊंट नंबर, पासवर्ड, एटीएम कार्ड किंवा इतर कोणताही फोटो ठेवला असेल तर तेही धोकादायक असेच आहे. या फोटोच्या माध्यमातून अगदी सहजपणे माहिती लिक होऊ शकते. तसेच फ्री वायफायचा वापर केल्याने आपली वैयक्तिक माहिती हॅकर्सना मिळू शकते.

मुख्यमंत्री मुंबईचे असल्याने मंत्रालयात आता दररोज कामकाज सुरू राहणार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SBI Warning Dont charge your mobile at Airport Railway Stations you may lose all your money