आसाराम बापुचा जामीन अर्ज सातव्यांदा फेटाळला...

वृत्तसंस्था
सोमवार, 30 जानेवारी 2017

जामीनासाठी 74 वर्षीय आसाराम याने केलेला हा 7 वा अर्ज होता. ऑगस्ट 2013 मध्ये एका अल्पवयीन युवतीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपांतर्गत आसाराम याची कोठडीत रवानगी करण्यात आली होती

नवी दिल्ली - स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापु याचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने आज (सोमवार) फेटाळून लावला.

याचबरोबर, अर्जास खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र जोडल्याबद्दल आसाराम याच्याविरोधात नवीन प्राथमिक चौकशी अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात यावा, असे निर्देशही न्यायालयाने दिले. कोणतेही गंभीर कारण नसताना असा अर्ज दाखल केल्याबद्दल आसाराम याला एक लाख रुपये दंड भरण्यासही सांगण्यात आले.

लैंगिक शोषणाच्या आरोपांतर्गत तुरुंगात असलेल्या आसाराम याने वैद्यकीय कारणांच्या पार्श्‍वभूमीवर जामीन मिळावा, अशी मागणी केली होती. जामीनासाठी 74 वर्षीय आसाराम याने केलेला हा 7 वा अर्ज होता. ऑगस्ट 2013 मध्ये एका अल्पवयीन युवतीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपांतर्गत आसाराम याची कोठडीत रवानगी करण्यात आली होती. हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आसारामविरोधातील या प्रकरणामुळे देशभरात खळबळ उडाली होती.

Web Title: SC denies bail to Asaram Bapu, again