राष्ट्रगीतासाठी चित्रपटगृहांत उभे राहणे बंधनकारक

वृत्तसंस्था
बुधवार, 30 नोव्हेंबर 2016

देशातील नागरिकांनी या आदेशाचे पालन करून देशाप्रती आदर व्यक्त करावा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाने सर्व चित्रपटगृह चालकांनाही चित्रपट सुरु होण्यापूर्वी राष्ट्रगीत लावण्यास सांगितले आहे. 

नवी दिल्ली - चित्रपटगृहांमध्ये चित्रपट सुरु होण्यापूर्वी राष्ट्रगीत लावल्यावर प्रेक्षकांनी उभे राहणे बंधनकारक असल्याचे आदेश आज (बुधवार) सर्वोच्च न्यायालयाने दिले.

चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत लावल्यानंतर उभे राहण्याचे बंधन सध्या फक्त महाराष्ट्रात आहे. आता सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करताना देशभरात हे लागू करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पडद्यावर तिरंगा झळकला तरी नागरिकांनी उभे रहावे, अशी सक्ती करण्यात आली आहे. न्यायाधीश दीपक मिश्रा आणि अमितवा रॉय यांच्या खंडपीठाने आज हा निर्णय दिला.

देशातील नागरिकांनी या आदेशाचे पालन करून देशाप्रती आदर व्यक्त करावा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाने सर्व चित्रपटगृह चालकांनाही चित्रपट सुरु होण्यापूर्वी राष्ट्रगीत लावण्यास सांगितले आहे. 

Web Title: SC directs there should not be dramatisation of the national anthem