सर्वोच्च न्यायालयाकडून निवडणूक आयोगाला नोटीस

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यांमधील निवडणुकीत बनावट मतदार असल्याचा आरोप केला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेनंतर न्यायाधीश ए. के. सिक्री आणि अशोक भूषण यांच्या खंडपीठाने निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे.

नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. काँग्रेस नेते कमलनाथ आणि सचिन पायलट यांनी बनावट मतदार असल्याचा आरोप करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतर न्यायालयाने निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे.

मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यांमधील निवडणुकीत बनावट मतदार असल्याचा आरोप केला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेनंतर न्यायाधीश ए. के. सिक्री आणि अशोक भूषण यांच्या खंडपीठाने निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान ज्येष्ठ विधिज्ञ ए. एम. सिंघवी यांच्यामार्फत कमलनाथ आणि सचिन पायलट यांनी याचिका दाखल केली. या याचिकेमध्ये कमलनाथ यांच्याकडून मध्यप्रदेशमध्ये सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणादरम्यान 60 लाख बनावट मतदार असल्याचे समोर आले.  

तसेच कमलनाथ यांनी सांगितले, की राजस्थानातही मोठ्या संख्येने बनावट मतदार आढळले. मध्यप्रदेशातील आगामी निवडणुकीत 'व्होटर व्हेरिफिकेशन पेपर ऑडिट ट्रेल' (व्हीव्हीपॅट) मशिन्सचा वापर केला जावा, अशी मागणीही कमलनाथ यांनी या याचिकेच्या माध्यमातून केली. 

Web Title: SC notice to Election Commisson over plea alleging duplicate voters in MP and Rajasthan