जम्मू-काश्‍मिरमध्ये शाळा जाळण्याचे सत्र सुरूच!

वृत्तसंस्था
शनिवार, 5 नोव्हेंबर 2016

बांदीपोरा (जम्मू-काश्‍मिर) : इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुऱ्हाण वाणीला लष्कराने ठार केल्यानंतर जम्मू-काश्‍मिरमध्ये पसरलेल्या अशांततेचे परिणाम अद्यापही दिसत असून शैक्षणिक संस्था जाळण्याचे सत्र सुरूच आहे. आज (शनिवार) बांदीपोरा जिल्ह्यात आणखी एक शाळा जाळण्यात आली आहे.

चार महिन्यांपासून राज्यात अशांतततेचे वातावरण आहे. तेव्हापासून समाजकंटकांमार्फत शैक्षणिक संस्था, शासकीय इमारती जाळण्यात येत आहेत. आतापर्यंत 31 शाळा आणि 110 शासकीय इमारती जाळण्यात आल्या आहेत. अज्ञात व्यक्तींनी जाळलेल्या या शाळांमध्ये शासकीय शाळांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. त्यामध्ये 25 शासकीय शाळा, दोन खाजगी तर चार ट्रस्टद्वारे किंवा संस्थेच्या शाळा जाळण्यात आल्या आहेत.

या सर्व पार्श्‍वभूमीवर जम्मू आणि काश्‍मिर उच्च न्यायालयाने शाळा जाळण्याचे प्रकार रोखण्यासाठी आवश्‍यक त्या उपाययोजना करण्याचे राज्य सरकारला आदेश दिले आहेत. यावर्षी 9 जुलै रोजीपासून राज्यातील अस्थिर वातावरणामुळे शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत. आमचे भविष्य अंधारात असल्याचे म्हणत राज्यातील विद्यार्थी चिंता व्यक्त करत आहेत. दरम्यान बुऱ्हाण वाणीचे वडिलांनाही शाळा जाळणे चुकीचे असल्याचे म्हणत हा प्रकार थांबविण्याचे आवाहन केले आहे. तर याच आठवड्यात केंद्र सरकारने शाळा पुन्हा सुरु कराव्यात यासाठी आवश्‍यक ती कारवाई करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत.

Web Title: School burning continues in Jammu Kashmir!