खाऊच्या पैशातून त्यांनी मैत्रिणीला दिली 'व्हिलचेअर'

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 जानेवारी 2017

जयपूर (राजस्थान)- श्री गंगासागर जिल्ह्यात असलेल्या एका खासगी शाळेतील दुसऱीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थिनींनी खाऊच्या पैशातून वर्गातील मैत्रिणीला व्हिलचेअर भेट देऊन समाजापुढे एक आदर्श निर्माण घालून दिला आहे.

रिदमलसार येथील इंग्लिश मॉर्डन स्कूलमधील दुसरीच्या वर्गात उषा शिक्षण घेत आहे. पायाने अपंग असल्यामुळे तिला वावरणे अवघड जात होते. शिवाय, तिच्या कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. ख्याती या विद्यार्थिनीने याबाबतची माहिती आपल्या आजोबांना दिली.

आजोबांनी नातीला विचारले की तुझ्या 'पिगी बॅंकेत' किती पैसे आहेत? अन् या हे पैसे तू त्या मैत्रिणीला देऊ शकतेस का? नातीनेही तत्काळ होकार दिला. परंतु, हे पैसे कमी पडणार होते. याबाबतची माहिती वर्गातील इतर विद्यार्थिंनींना दिली. विद्यार्थिंनींसुद्धा होकार देत खाऊचे पैसे एकत्र गोळा केले अन् व्हिलचेअर खरेदी केली.

शाळेमध्ये नुकत्याच झालेल्या कार्यक्रमादरम्यान उषाला व्हिलचेअर भेट देण्यात आली. यावेळी उषाच्या चेहऱयावरून आनंद ओसंडून वाहत होता. विद्यार्थिनींनी समाजापुढे घालून दिलेल्या आदर्शाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Web Title: school students pool pocket money to buy wheelchair for girl