New Delhi : दिल्लीत प्रदूषणामुळे शाळा बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

delhi
दिल्लीत प्रदूषणामुळे शाळा बंद

दिल्लीत प्रदूषणामुळे शाळा बंद

नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत प्रदूषणाने कहर केला असून पुढील आदेशापर्यंत विद्यार्थ्यांना शाळांमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार नाही. ऑनलाइन अध्ययन यापुढेही सुरूच राहील, असे शिक्षण संचालनालयाने सपष्ट कले. हवेचा दर्जा अत्यंत खराब असल्याने हा निर्णय घेण्यात आला.
दिल्लीत रविवारी सकाळीही हवेचा दर्जा अत्यंत खराब होता.

सकाळी नऊ वाजता हवेचा गुणवत्ता निर्देशांक ३८२ इतका नोंदविला गेला. शनिवारी या निदेशांकाची सरासरी ३७४ होती. शिक्षण विभागाच्या अतिरिक्त संचालक रिटा शर्मा म्हणाल्या,की दिल्ली व राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिसरासाठी वायू गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाच्या पुढील आदेशापर्यंत सर्व शाळा ताबडतोब बंद करण्याचे आदेश पर्यावरण विभागाने दिले आहेत. मात्र, यापूर्वीच्या सूचनेप्रमाणे ऑनलाइन अध्ययन आणि बोर्डाच्या परीक्षा घेतल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यापूर्वी, हवेचा दर्जा सातत्याने खालावत असल्याने दिल्ली सरकारने १३ नोव्हेंबरला दिल्लीतील सर्व शाळा व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याची घोषणा केली होती. कोरोनामुळे तब्बल १९ महिने बंद असलेल्या शाळा नुकत्याच एक नोव्हेंबरला सुरू झाल्या होत्या.

loading image
go to top