पुढील 3 दिवस दिल्लीतील शाळा बंद: केजरीवाल

वृत्तसंस्था
रविवार, 6 नोव्हेंबर 2016

तातडीची उपाययोजना करण्याची वेळ आली आहे. प्रदूषणाच्या मुद्याचे राजकारण करण्याऐवजी त्यावर दोघांनी (दिल्ली आणि केंद्र सरकार) मिळून उपाय शोधण्याची गरज आहे. प्रदूषणाची पातळी उंचावली आहे. आम्ही तज्ज्ञांशी चर्चा केली असून काही तातडीचे उपाय करत आहोत.

- अरविंद केजरीवाल

मुख्यमंत्री , नवी दिल्ली

नवी दिल्ली - दिल्लीतील प्रदूषण आणि धुक्‍याच्या पार्श्‍वभूमीवर दिल्लीतील पुढील तीन दिवस शाळा बंद ठेवण्याचा निर्णय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घेतला आहे.

प्रदूषण आणि धुक्‍याची समस्या आणि त्यावरील उपाययोजनांविषयी चर्चा करण्यासाठी दिल्ली सरकारने आज तातडीची कॅबिनेट बैठक बोलाविली होती. या बैठकीत प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी काही निर्णय घेण्यात आले. या बैठकीबाबत प्रसारमाध्यमांना माहिती देताना केजरीवाल म्हणाले, "तातडीची उपाययोजना करण्याची वेळ आली आहे. प्रदूषणाच्या मुद्याचे राजकारण करण्याऐवजी त्यावर दोघांनी (दिल्ली आणि केंद्र सरकार) मिळून उपाय शोधण्याची गरज आहे. प्रदूषणाची पातळी उंचावली आहे. आम्ही तज्ज्ञांशी चर्चा केली असून काही तातडीचे उपाय करत आहोत.'

दिल्ली सरकारने जाहीर केलेले तातडीचे उपाय खालीलप्रमाणे

  1. दिल्लीतील सर्व शाळा पुढील तीन दिवस बंद राहतील.
  2. पुढील पाच दिवस दिल्लीत बांधकाम आणि जुने बांधकाम पाडता येणार नाही.
  3. पुढील दहा दिवसांसाठी रुग्णालये आणि तातडीची ठिकाणे सोडून इतरत्र डिझेलवर चालणाऱ्या जनरेटरर्सवर बंदी.
  4. दिल्लीतील ज्या अनधिकृत वसाहतींना डिझेल जनरेटर्सवरून वीज पुरविण्यात येते अशा वसाहतींना दिल्ली सरकार वीज पुरविणार.
  5. कोळश्‍यावर चालणारे बादरपूर वीज निर्मिती केंद्र पुढील 10 दिवसांसाठी बंद राहणार. त्यामुळे या केंद्रातून हवेत राख सोडली जाणार नाही.
  6. सोमवारपासून रस्त्यावर पाणी शिंपडले जाणार.
  7. रस्त्यांची साफसफाई (Vaccum Cleaning) 10 नोव्हेंबरपासून सुरू होणार.
Web Title: Schools closed for next 3 days : Kejriwal