Article 370 : जम्मू-काश्मीरातील शाळा, महाविद्यालये सोमवारपासून होणार सुरु

Article 370 : जम्मू-काश्मीरातील शाळा, महाविद्यालये सोमवारपासून होणार सुरु

श्रीनगर : जम्मू काश्मीरातील कलम 370 हटविल्यानंतर राज्यात अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र, मागील 2-3 दिवसांपासून काश्मीरातील परिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे राज्य प्रशासनाकडून राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालय आणि सरकारी कार्यालये येत्या सोमवारपासून सुरु केल्या जाणार आहेत. याबाबतचे आदेश प्रशासनाकडून जारी करण्यात आले. 

कलम 370 हटविल्यानंतर जम्मू काश्मीरातील परिस्थिती तणावग्रस्त झाली होती. त्यामुळे सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक बंदी घालण्यात आली. त्यानंतर आता राज्यातील परिस्थिती पूर्वपदावर होत आहे. त्यामुळे आता सरकारी कार्यालये, सचिवालय दैनंदिन कामकाजाला सुरवात करतील. 

दरम्यान, राज्यात लावण्यात आलेले निर्बंध परिस्थितीनुसार हटविण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. राज्यातील इंटरनेट, फोन सेवांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे या सेवांवरील बंदी हटविण्यात येईल, अशी माहिती राजभवनाच्या सूत्रांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com