दुसरे कोणार्क मंदिर लवकरच प्रत्यक्षात 

Sculptor Raghunath Optimistic About Construction Of Second Konark Temple
Sculptor Raghunath Optimistic About Construction Of Second Konark Temple

भुवनेश्‍वर : राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर नियुक्त करण्यात आलेले आघाडीचे शिल्पकार रघुनाथ मोहपात्रा यांनी दुसरे कोणार्क मंदिर साकारण्याचा विडा उचलला असून, हे मंदिरदेखील लवकरच साकार होईल, असा विश्‍वास त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. मोहपात्रा यांनी आज येथील लिंगराज मंदिरास भेट दिल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. दुसरे कोणार्क मंदिर उभारण्याच्या माझ्या संकल्पास राज्य आणि केंद्र सरकार पाठिंबा देईल, अशी मला आशा आहे असेही त्यांनी नमूद केले. मोहपात्रा यांच्यासोबत केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीदेखील लिंगराज मंदिरास भेट दिली. 

मोहपात्रा यांच्यासोबत आघाडीच्या ओडिशी नृत्यांगना सोनल मानसिंग यांना राष्ट्रपतींनी राज्यसभेवर नियुक्त केले आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पहिल्यांदाच ओडिशातील कलावंतास राज्यसभेची खासदारकी मिळाली आहे. भगवान जगन्नाथाच्या कृपेमुळेच आपण खासदार झालो असून, नव्या कोणार्क मंदिराच्या निर्मितीसाठी आपण पंतप्रधानांची भेट घेतली असून, शनिवारपासून यावर कामदेखील सुरू झाले आहे, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, राज्यसभेवर नियुक्ती झाल्याबद्दल मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी मानसिंग आणि मोहपात्रा यांचे अभिनंदन केले आहे. तत्पूर्वी 2014 मध्ये मोहपात्रा यांनी अपक्ष उमेदवार म्हणून राज्यसभेची निवडणूक लढविली होती, त्यांना बिजू जनता दल आणि भाजपनेही पाठिंबा दिला होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com