हद्दच झाली! 'सर्वोत्तम अभियंता', म्हणत, SDO ने कार्यालयात लावला ओसामा बिन लादेनचा फोटो; सरकारने... | sdo from uppcl dismissed for allegedly putting up picture of terrorist osama bin laden in his office | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

osama bin laden

हद्दच झाली! 'सर्वोत्तम अभियंता', म्हणत SDO ने कार्यालयात लावला ओसामा बिन लादेनचा फोटो; कारवाईत...

लखनौ - दहशतवादी ओसामा बिन लादेनचे छायाचित्र आपल्या कार्यालयात लावून त्याला आपला आदर्श बनवल्याच्या आरोपाखाली उत्तर प्रदेशच्या विद्युत विभागात नियुक्त केलेल्या एका उपविभागीय अधिकाऱ्याला (एसडीओ) सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. एका अधिकाऱ्याने मंगळवारी याला दुजोरा दिला.

दक्षिणांचल विद्युत वितरण निगमचे व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी अमित किशोर यांनी सांगितले की, त्यांच्या शिफारशीवरून उत्तर प्रदेश पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (UPPCL) चे अध्यक्ष एम देवराज यांनी विभागीय SDO रवींद्र प्रकाश गौतम यांची सेवा समाप्त केली आहे.

सौदी अरेबियातील एका श्रीमंत कुटुंबात जन्मलेला ओसामा बिन लादेन हा अल कायदा नावाच्या दहशतवादी संघटनेचा प्रमुख होता, तो 2011 मध्ये वयाच्या 54 व्या वर्षी पाकिस्तानातील अबोटाबाद शहरात अमेरिकन सैन्याने केलेल्या कारवाईत मारला गेला. 11 सप्टेंबर 2011 रोजी अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अल कायदाचे नाव पुढे आले होते.

तपासात असे आढळून आले की, एसडीओने दहशतवादी ओसामा बिन लादेनचा फोटो लावला होता आणि त्याला त्याने सर्वोत्तम अभियंता म्हटले होते. सूत्रांनी सांगितले की, जून 2022 मध्ये, फर्रुखाबाद जिल्ह्याच्या कायमगंज उपविभाग-II मध्ये तैनात असलेले SDO रवींद्र प्रकाश गौतम यांनी त्यांच्या कार्यालयात दहशतवादी ओसामा बिन लादेनचा फोटो लावला होता. हे वृत्त चर्चेत आल्यानंतर दक्षिणाचल विद्युत वितरण निगमने एसडीओला निलंबित करतानाच या प्रकरणाचा तपास सुरू केला.

कॉर्पोरेशनचे एमडी अमित किशोर यांनी एसडीओ गौतम यांची यूपीपीसीएल चेअरमन यांना सेवा संपुष्टात आणण्याची शिफारस केली होती, त्यानंतर तपासात आरोपांमध्ये तथ्य आढळून आल्यानंतर सोमवारी रवींद्र प्रकाश गौतम यांना बडतर्फ करण्यात आले. यूपीपीसीएलचे अध्यक्ष एम देवराज यांनी एसडीओ गौतम यांची सेवा संपुष्टात आणताना त्यांच्या आदेशात म्हटले आहे की, गौतम यांनी उच्च अधिकार्‍यांविरुद्ध असभ्य भाषा आणि थेट पत्रव्यवहार केला, जो घोर अनुशासनहीन आहे.

टॅग्स :Uttar Pradesh