कानपूरजवळ रेल्वेचे 15 डबे घसरले; दोन ठार

वृत्तसंस्था
बुधवार, 28 डिसेंबर 2016

केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ट्विट करत सांगितले, की मी स्वतः या घटनेवर लक्ष ठेवून आहे. वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठविण्यात आले आहे. जखमींना सर्वोतोपरी मदत करण्यात येत आहे.

कानपूर - उत्तर प्रदेशातील कानपूरजवळ आज (बुधवार) पहाटे अजमेर-सियालदाह एक्स्प्रेसचे 15 डबे रुळावरून घसरल्याने झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले असून, 26 जखमी झाले आहेत.

रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कानपूरपासून 70 किमी अंतरावर असलेल्या रुरा येथे आज पहाटे कानपूर-सेलदाह एक्स्प्रेस (रेल्वे नं. 12987) 15 डबे रुळावरून घसरले. पहाटे साडेपाचच्या सुमारास घडलेल्या या अपघातात दोन जण ठार झाले आहेत. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या अपघातामुळे इटवाह आणि कानपूर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. घसरलेले डबे रुळावरून हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. पोलिस व स्थानिक प्रशासनाच्या मदतीने नागरिकांना योग्य ती मदत पोचविण्यात येत आहे. कानपूरमधील वैद्यकीय पथक घटनास्थळी पोचले आहे. इटवाह मार्गावरील वाहतूक तुंडला मार्गे वळविण्यात आली आहे. 

केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ट्विट करत सांगितले, की मी स्वतः या घटनेवर लक्ष ठेवून आहे. वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठविण्यात आले आहे. जखमींना सर्वोतोपरी मदत करण्यात येत आहे.

Web Title: Sealdah-Ajmer Express derails near Kanpur: two killed and 26 injured