बेपत्ता नजीबच्या शोधासाठी "जेएनयू'त शोधमोहीम

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

नवी दिल्ली ः अचानक बेपत्ता झालेल्या नजीब अहमदविषयी काही पुरावे मिळतात का, याच्या शोधार्थ आज दिल्ली पोलिसांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) परिसरात मोठी शोधमोहीम राबविली.

श्वान पथकासह दिल्ली पोलिस दलातील सहाशेहून अधिक पोलिस कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते. त्यांनी विद्यापीठ परिसराची कसून तपासणी केली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी संबंध असल्याच्या संशयावरून 15 ऑक्‍टोबरला झालेल्या हाणामारीनंतर नजीब बेपत्ता झाला आहे. त्याची माहिती देणाऱ्यास 10 लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे.

Web Title: search campaign for najib in jnu