पाककडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचा भंग

वृत्तसंस्था
बुधवार, 3 मे 2017

मागील 48 तासात पाकिस्तानने दुसऱ्यांदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला आहे. आज (बुधवार) पहाटे पाकने मेंढर जवळील मनकोट येथे पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात येत आहे.

मनकोट (जम्मू-काश्‍मीर) : मागील 48 तासात पाकिस्तानने दुसऱ्यांदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला आहे. आज (बुधवार) पहाटे पाकने मेंढर जवळील मनकोट येथे पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात येत आहे.

आज पहाटेपासून सीमेपलिकडून थोड्या थोड्या अंतराने गोळीबार करण्यात येत आहे. भारताकडून गोळीबार करून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. सोमवारीच पाकने पूँछ येथे गोळीबार केला होता. कृष्णा घाटी परिसरात पाकने हुतात्मा झालेल्या दोन भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना केली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा गोळीबार करण्यात येत आहे.

सोमवारी प्रत्यक्ष ताबारेषेनजीक कृष्णा घाटी भागात गस्त घालणाऱ्या तुकडीवर पाकिस्तानने गोळीबार केला. यात हुतात्मा झालेल्या जवानांच्या मृतदेहाची विटंबनाही पाकिस्तानी सैनिकांनी केली. पाकिस्तानच्या या कुरापतीमध्ये नायब सुभेदार परमजितसिंग आणि हेड कॉन्स्टेबर प्रेम सागर हुतात्मा झाले. गेल्या महिनाभरात पूंच आणि राजौरी भागामध्ये पाकिस्तानने सात वेळा शस्त्रसंधीचा भंग करत गोळीबार केला आहे. पाकिस्तानी सैन्याच्या या कृत्यामुळे दोन्ही देशांमधील तणावामध्ये भरच पडणार अहे. नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना "हेर' ठरवून पाकने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. यामुळे दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. त्यातच, कुलभूषण जाधव यांना भेट देण्यासही पाकने मनाई केली आहे. यामुळे भारताने आंतराष्ट्रीय पातळीवरून राजनैतिक दडपण आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

Web Title: Second ceasefire violation by pakistan in 48 hours