जम्मूतील कलम 144 हटविले; शाळा, महाविद्यालय सुरु

जम्मूतील कलम 144 हटविले; शाळा, महाविद्यालय सुरु

जम्मू : जम्मूमध्ये लागू असलेले कलम 144 आज (शुक्रवार) हटवण्यात आले आहे. त्यामुळे उद्यापासून (शनिवार) सर्व शाळा आणि महाविद्यालये सुरु करण्यात येणार आहेत, अशी माहिती जम्मूच्या उपायुक्त सुषमा चौहान यांनी दिली आहे. तसेच राज्यातील इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात येणार आहे, असेही त्या म्हणाल्या.

जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारा कलम 370 मधील अनुच्छेद रद्द करण्याची घोषणा करण्यापूर्वी राज्यात संचारबंदी कलम 144 लागू करण्यात आले होते. मात्र, आज नमाज पठणासाठी 144 कलम शिथिल केले जाईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. त्यानुसार आता राज्यात 144 कलम हटविण्यात आले आहे.

सुरक्षा यंत्रणांना अधिक लक्ष द्यावे लागणार 

370 रद्द करण्यात आले आहे. त्यानंतर लगेचच राज्यात जमावबंदी लागू करण्यात आली होती. मात्र, आता 144 हे कलम हटवण्यात आले. त्यामुळे आता सुरक्षा यंत्रणांना अधिक लक्ष द्यावे लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com