सुरक्षा दलांत "मेगा'भरती

वृत्तसंस्था
सोमवार, 23 जुलै 2018

सीआरपीएफ, सीआयएसएफ, बीएसएफ, आयटीबीपी अशा केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांमध्ये रिक्त असलेल्या 54 हजार 953 जागा भरण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याअंतर्गत इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून, 10 ऑगस्ट ही अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आहे. केंद्रीय सुरक्षा दलांमधील कॉन्स्टेबल (जीडी) आणि रायफल मॅन या पदासाठी ही भरती होत असून, इच्छुकांना आपले अर्ज ऑनलाइन सादर करावयाचे आहेत. 21 जुलैपासून हे अर्ज भरून घेण्यात सुरवात झाली आहे. 

नवी दिल्ली - सीआरपीएफ, सीआयएसएफ, बीएसएफ, आयटीबीपी अशा केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांमध्ये रिक्त असलेल्या 54 हजार 953 जागा भरण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याअंतर्गत इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून, 10 ऑगस्ट ही अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आहे. केंद्रीय सुरक्षा दलांमधील कॉन्स्टेबल (जीडी) आणि रायफल मॅन या पदासाठी ही भरती होत असून, इच्छुकांना आपले अर्ज ऑनलाइन सादर करावयाचे आहेत. 21 जुलैपासून हे अर्ज भरून घेण्यात सुरवात झाली आहे. 

येथे करा अर्ज 
उमेदवार http://www.ssconline.nic.in, http://www.ssc.nic.in या संकेतस्थळांच्या माध्यमातून आपला अर्ज सादर करू शकतात. 

भरतीविषयी महत्त्वाचे 
- एकूण जागा ः 54 हजार 953 
- शैक्षणिक पात्रता ः 10 वी पास 
- उमेदवाराचा वयोगट ः 19 ते 23 
- परीक्षा प्रकार ः ऑनलाइन 
- अतिम मुदत ः 20 ऑगस्ट 2019 
- ऍडमिट कार्ड ः परीक्षेच्या 10 दिवस अगोदर 
- परीक्षेची तारीख ः अद्याप घोषित नाही 

पुरुष उमेदवारांसाठी ः 47,307 जागा 
महिला उमेदवारांसाठी ः 7,643 जागा 
 

Web Title: in Security Force Mega requirment are open