एटीएम लुटण्यासाठी सुरक्षारक्षकाचा खून

वृत्तसंस्था
रविवार, 18 डिसेंबर 2016

पाटणा : 'एटीएम'साठी तैनात सुरक्षारक्षकाचा अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री धारदार शस्त्राने खून केल्याची घटना घडली आहे.

शहरातील मौर्यलोक कॉम्पलेक्‍समध्ये सेंट्रल बॅंकेचे एटीएम असून, तेथे कुंदन कुमार हा रक्षक तैनात होता. शुक्रवारी मध्यरात्री चोरीच्या उद्देशाने तेथे आलेल्या चोरट्यांनी कुंदनचा खून केल्यानंतर एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र यात त्यांना अपयश आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, या घटनेनंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, कुंदनच्या कुटुंबीयांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

Web Title: security guard killed for looting atm